आजपासून काम सुरू, वाहतुकीत बदल
ठाणे : कापूरबावडी इंटिग्रेटेड मेट्रो स्थानकासाठी पहिला ‘यू गर्डर’ उभारण्याचे नियोजन १४ डिसेंबर 2024 रोजी रात्री ८ वाजता ते दुस-या दिवशी सकाळी ७ वाजेपर्यंत करण्यात आले आहे. त्यामुळे कामासाठी वाहतुक वळणांचे नियोजन करण्यात आले आहे.
‘यू गर्डर्स (स्पॅन ) उभारण्यात येणार असून, ते तत्वज्ञान जंक्शन/विहंगम हॉटेल ते अॅप्रिकॉट रोड जंक्शन/ आर मॉलजवळ असणार आहे. त्यामुळे कासारवडवलीकडे जाणारी वाहतूक ही घोडबंदर रस्त्यावरील मुख्य वाहिनी आणि सेवा रस्त्यावरील वाहतूक तनिष्क/तत्वज्ञान जंक्शन येथे बंद करण्यात येणार आहे आणि एकेरी वाहतूक विरुद्ध बाजूच्या वाहिनी ‘आर मॉल’च्या वाहिनीवरुन ‘आर मॉल’च्या अलिकडिल अॅप्रिकॉट स्ट्रीट जंक्शनपासून डाव्या नियमित वाहीनीवर पुर्ववत आणण्यात येणार आहे.
रवी काटा, तनिष्क/तत्वज्ञान येथून कासारवडवलीकडे जाणा-या वाहतुकीसाठी पर्याय
रवीकाटा किवा तत्वज्ञान /तनिष्क येथे डावीकडे वळण घेऊन पोखरण रस्ता क्र. दोनमार्गे ठामपा उन्नत जलसाठा-घाणेकर सभागृह-खेवरा सर्कल-सुभाषचंद्र बोस चौक-व्हेरॅटॉन, घोडबंदर रस्त्यावरील अॅप्रिकॉट स्ट्रीट रोड जंक्शन/दोस्ती एम्पेरिया जंक्शन/ टायटन ईस्पितळ/ मुल्ला बाग येथे वाहने नियमितपणे आणता येतील.
‘आर मॉल’विरुद्ध बाजुकडील सेवा रस्ता वाहिनीवरुन एकेरी वाहतूक वळवून विहंगम हॉटेलजवळील पादचारी पुलानंतर नियमित मुख्य वाहिनीवर वाहने नियमितपणे आणता येतील.
ब्रम्हांड येथे डावीकडे वळण घेऊन ढोकळीमार्गे कापूरबावडी/माजिवडा जंक्शन येथे वाहने सुलभतेने जाऊ शकतात. वाहने मानपाडा उड्डाण पुलाखालून उजवे वळण घेउन गौरव/ सुभाषचंद्र बोस चौक येथे डावीकडे वळून पोखरण रस्ता क्रमांक २ मार्गे, रवीकाटा माजिवडा येथे घोडबंदर रस्त्याच्या सेवा रस्त्यावरील वाहतूक सुलभतेने आणता येतील.