अखेर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक झाला स्वच्छ

ठाणे : कल्याण महानगरपालिकेच्या आयुक्तांच्या आदेशानंतर कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक ब-याच दिवसांनंतर चकाचक झाला आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांच्या तक्रारींमुळे स्वच्छ झाला आहे.

मागील कित्येक महिन्यांपासून कल्याण पूर्वेकडील स्कायवॉक केरकच-याने भरला होता. स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याने स्थिती दयनीय होती. याबाबत येथून प्रवास करणारे आरटीआय कार्यकर्ते गलगली यांनी ट्विट केले आणि त्यानंतर आयुक्त डॉ. इंदूराणी जाखड यांना याबाबत माहिती कळविली. आयुक्त यांनी तक्रारीची त्वरित दखल घेतली आणि संबंधित विभागाला आदेश दिले. यानंतर त्वरेने चक्रे फिरली आणि कित्येक महिन्यांपासून अस्वच्छ असलेला स्कायवॉक पूर्णपणे स्वच्छ करण्यात आला.