ठाणे : जिल्ह्यात आज देखिल एकही नवीन कोरोना रूग्ण आढळून आला नाही तर अवघे दोन रूग्ण सक्रिय असून कोरोना हद्दपार झाल्याचे बोलले जात आहे.
जिल्ह्यातील महापालिका, नगरपालिका आणि ठाणे ग्रामीण भागात एकही नवीन रूग्ण सापडला नाही. जिल्ह्यात नवी मुंबई आणि ठाणे महापालिका हद्दीत प्रत्येकी एक सक्रिय रुग्णांवर घरी आणि रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
आत्तापर्यंत जिल्ह्यात सात लाख ४७,४५१जण बाधित मिळाले आहेत तर सात लाख ३२,२४५ रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत आत्तापर्यंत ११,९६९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे