मुरुमे आणि चेहऱ्यावरील खड्ड्यांच्या प्रतिबंधासाठी सौंदर्य तज्ज्ञांचा सल्ला

चेहऱ्यावर पुरळ सर्व वयोगटातील व्यक्तींना येतात. ज्यामुळे व्यक्ती केवळ शारीरिकदृष्ट्या नाही तर मानसिकदृष्ट्या तिचे खच्चीकरण होते. आपली त्वचा निरोगी व scar विरहित कशी राहील यासाठी सौंदर्यतज्ज्ञ डॉ. राजेंद्र पाटील यांचा मौल्यवान सल्ला

आजच्या धकाधकीच्या जीवनात अवेळी खाणेपिणे, निद्रानाश, मानसिक ताणतणाव, सत्वरहित अन्न (जंक फूड) आणि precautions puberty या अनेक समस्यांमुळे चेहऱ्यावर मुरूमं व खड्ड्यांचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर दिसायला लागले आहे. डिजिटलायझेशनमुळे सोशल मीडियावर होणाऱ्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सच्या अतिवापरामुळे त्या पुरळांचे रूपांतर scars मध्ये होते. ते कशामुळे ?

आज आपण बघतो तरुणपिढी आपल्या आवडत्या अभिनेता / अभिनेत्री सारखी स्वतःच्या त्वचेबाबत दिनचर्या अनुसरतात. किंवा एखादी जाहिरात नाहीतर एखादा influencer (प्रभावक) जे सांगतो त्याचे अनुसरण करतात. पण ते खरच योग्य आहे का ? तर नाही. अशा परिस्थितीत मुरुमांची काळजी आपण कशा पद्धतीने घेऊ शकतो, याबाबत थोडक्यात माहिती घेऊ.

१. सुसंगत स्किन केअर दिनचर्या तयार करा आणि ती तयार करण्याआधी आपल्या जवळच्या कॉस्मेटोलॉजी (cosmetologics)/ त्वचातज्ज्ञ (dermatologist) चा सल्ला घ्या. कारण ते तुमच्या त्वचेचे विश्लेषण (analysis) करून योग्य ती उत्पादने सूचित करतील.

• सौम्य cleanser ने चेहरा धुणे.
* त्वचेला हायड्रेट करण्यासाठी व हानिकारक अतिनील किरणांपासून संरक्षण करण्यासाठी non-comedogenic moisturiser आणि सनस्क्रिनची निवड करा.
* योग्य उत्पादने निवडा : आजकाल आपण बघतो कोणीही कुठलेही प्रोडक्ट आपल्या चेहऱ्यावर लावतात. ज्याच्यामुळे मुरूमं वाढू शकतात. म्हणून स्निग्ध पदार्थ असलेले (greasy substance) असे फॉर्म्युलेशन टाळा. रात्री झोपण्याआधी पूर्णपणे मेकअप काढून त्यावर non-comedogenic मॉइश्चर लावणे.

* वैद्यकीय उपचार :
तुमच्या स्किन केअर रूटीनमध्ये benzyol peroxide salisalic acid किंवा retenoids यासारख्या मुरमांशी लढणारे घटक समाविष्ट करा. हे घटक open pores, acne scars, सेल टर्न ओव्हर वाढवण्यासाठी मदत करतात. मुरुमांवरील डाग व scars प्रतिबंधित करण्यासाठी मदत होते. घरगुती काळजी घेण्याच्या प्रयत्नांनंतर पुरळ कायम राहिल्यास किंवा डाग पडण्याची चिन्हे दिसल्यास त्वरित तुमच्या त्वचारोगतज्ज्ञ किंवा सौंदर्यतज्ज्ञांचा सल्ला घा. कारण ते मुरुमांच्या तीव्रतेनुसार तुम्हाला लवकरात लवकर बरे करू शकतात.

* काय खावे व काय खाऊ नये :

काय खावे:-

* मोड आलेले कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, फळे (संत्री, मोसंबी, कलिंगड, ड्रॅगन फ्रुट, स्ट्रॉबेरी, लिची).

* व्हिटॅमिन A खूप आवश्यक घटक आहे. ह्यासाठी गाजर, पालक आणि बिटाचा आपल्या आहारात समावेश करावा.

* भरपूर पाणी प्यावे. यामुळे शरीरातील उष्णता व toxins यांचा समतोल राहतो.

काय खावू नये:-

* चीज, चॉकलेट, बटर, बेकरी प्रोडक्ट, व स्निग्ध पदार्थ टाळावेत.

* पाणीपुरी, शेवपुरी, पिझ्झा, बर्गर, वडापाव, समोसा यासारखे तेलकट पदार्थ टाळावेत.

* आंबट व आंबवलेले पदार्थ तसेच डेअरी प्रोडक्ट पदार्थांचा समावेश आहारात टाळावा.

डॉ राजेंद्र पाटील
कॉस्मेटोलॉजिस्ट आणि ट्रायकोलॉजिस्ट
डर्माट्रिक्स हेल्थकेअर लि.