“आनंद यात्रा” सांगीतिक कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ‘डॉ. काशीनाथ घाणेकर लघु नाट्यगृह, ठाणे (प) येथे, ‘सूर नवा ध्यास नवा’ या कार्यक्रमातील राजगायक व सुवर्णकट्यारीचे मानकरी, प्रसिद्ध गायक ठाणे गौरव प्रशांत काळं द्ु रेकर यांचा “आनंद यात्रा” एका ध्येवेड्या कलाकाराचा संगीतप्रवास हा सांगितिक कार्यक्रम नुकताच सादर झाला.

त्यांच्या सांगीतिक प्रवासाचा रौप्यमहोत्सव आणि वयाचा सुवर्णमहोत्सव असा दुग्धशर्करा योग साधून त्यांच्या सर्वशिष्यांनी व ‘एक संवाद’ या संस्थेच्या सभासदांनी प्रेमाने आणि आपुलकीने हा कार्यक्रम आयोजित केला. त्यांना ही गुरुदक्षिणा देऊन त्यांच्याविषयी कृ तज्ञता व्यक्त केली. या प्रसंगी आमंत्रित असलेल्या त्यांच्या सर्व कलाकार सहकाऱ्यांनी आपली उपस्थिती नोंदवून आपली बावनकशी कला सादर केली. आनंदयात्रेमध्येत्यांनी अभंग, गीतरामायणातील काही गीते, भावगीते, नाट्यगीते, गझल, द्वंदगीते, फिल्मी गीते असे अनेक गीत प्रकार मोठ्या ताकदीने सुरेलपणे व अत्यंत नजाकतीने सादर केले. सह-गायिका स्मुग्धा माळी आणि मेघना काळं द्ु रेकर यांची सुरेल साथ त्यांना लाभली. उत्तम सादरीकरणामुळे, गाण्यांनी रसिकांच्या मनावर अगदी पहिल्याच गाण्यापासून ताबा मिळवला तो अगदी भैरवी पर्यंत. दिलीप जोशी, मयुरेश साने यांच्या निवेदनाने कार्यक्रमात बहार आणून त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली. प्रख्यात निवेदिका, व्यासंगी आणि संत साहित्याच्या अभ्यासक विदुषी धनश्रीताई लेले यांच्या उपस्थितीने आणि अभंगावरील निरुपणाने हा सोहळा वेगळ्याच उंचीवर गेला तर राजेंद्र पाटणकर यांनी समयोचित निवेदनाने कार्यक्रमाची सांगता केली.

‘धन्य भाग सेवा’ आणि ‘लागा चूनारिमे दाग’ या भैरवीचे सूर कानात ठेवूनच रसिक नाट्यगृहाबाहेर पडले. या अत्यंत दिमाखदार आणि देखण्या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये रवी नवले आणि सुचेता कलोती यांचा सिंहाचा वाटा होता. ध्वनि व्यवस्था भगवान भोईर यांनी उत्तमपणे सांभाळली. आनंदयात्रेमध्ये ‘ए मेरी जोहराजबि’ या
कव्वाली वर रसिक फिदा झाले तर काहींनी नृत्याचा आनंद लुटला. या प्रसंगी विनायक जोशी आणि राजेंद्र पाटणकर यांनी प्रशांत काळं द्ु रेकर यांच्या सांगितिक कारकिर्दीवर तयार केलेली दृक – श्राव्य फिल्म दाखविली तर मध्यंतरानंतर उपस्थित गायिका, वादक आणि निवेदक यांचा उचित गौरव केला गेला. भविष्यामध्ये अशाच
प्रकारचे दर्जेदार कार्यक्रम शिवरंजनी एन्टरटेन्मेंटचे रवी नवले, सुचेता कलोती, गायक प्रशांत काळं द्ु रेकर आणि शिष्य वर्ग यांनी सादर करावेत अशी चर्चा आणि अपेक्षा उपस्थित रसिकांकडून व्यक्त झाली.