वर्धा येथेसंपन्न झालेल्या ९६ व्या अखिल भारतीयमराठी साहित्य संमेलनात भाषणांचा सूर पाहता तो परिपक्व होता असेम्हणावेलागेल. राजकारणी आणि साहित्यिक यांच्यातून विस्तव जात नसण्याच्या दिवसात उभय पक्षी समंजस भूमिका घेतल्याचे दिसून आले. त्यामुळेआगामी काळात या आघाडीवर अधिक समजूतदारपणा दिसेल आणि दोन्ही बाजूंतर्फे हितावह अशी पूरक भूमिका मांडली जाईल ही अपेक्षा आहे. वर्धा येथेसंमेलन झाल्यामुळेविनोबा भावेआणि महात्मा गांधी यांच्या विचार – वारसाचा प्रभाव दिसला नसता तरच आश्चर्य होते. हा करंटेपणा वक्त्यांनी दाखवला नाही ही त्यांची परिपक्वता ! देशात रस्त्यांचेजाळे निर्माण करणारेकें द्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी साहित्यिक आणि राजकारणी यांच्यामध्ये समजुतदारपणाचा पूल बांधण्याचा प्रयत्न समारोपाच्या भाषणात के ला. ‘साहित्यिकांनी प्रखरपणेविचार मांडायला पाहिजेत आणि त्यांचा हा अधिकार राजकारण्यांनी मान्य करायला हवा’, असे तेम्हणाले. हा विचार महत्वाचा आहेकारण अनेकदा या मुद्द्यावरून वादांचा उद्रेक होत असतो. संघर्षाची ठिणगी पाडणारे अनेकदा हेतथाकथित साहित्य वाचत नसतात, संघर्षाच्या ठिणगीला हवा देणाऱ्यांचा वाचनाशी संबंध नसतो, त्यांच्यासाठी नेत्यांचेआदेश आणि भावना भडकवणारी विधानेप्रमाण ठरतात आणि अक्षरशत्रूंमुळे समाजाचेस्वास्थ्य बिघडत असते. लोकशाही एका कोपऱ्यात उभी राहून हा तमाशा अनेकदा बघत असते. प्रसंगी होरपळून निघत असते. इतिहासाची पुस्तके , चित्रपट, नाटक वगैरेसाहित्याचेप्रकार या राजकीय पूर्वदषूित वातावरणाला हवा देत राहतात. श्री.गडकरी यांनी के लेलेआवाहन या पार्भूमीव श्व र असावे, असे वाटते. आम्हाला तेयोग्य वाटतेकारण मराठी माणसाच्या वैचारिकतेची तेद्योतक आहे. दसु रेभाषण ज्यानेआमचंलक्ष वेधून घेतलेते होते साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक श्रीकांत देशमुख यांचे. त्यांचेभाषण अधिक थेट होते. विद्यमान सत्तारूढ पक्षाला आव्हान देणारे होते. श्री.देशमुख यांनी ‘गांधीजी तेविनोबाजी:वर्तमानाच्या परिप्रेक्ष्यातून’ या विषयावरील परिसंवादात बोलताना मनमोकळेपणानेकाही विधाने के ली. गांधी-विनोबांचा सद्भावनेवर विश्वास होता. परंतु २०१४ च्या नवीन स्वातंत्र्यानंतर ही सद्भावना नष्ट झाली. बोलणाऱ्यांचीच जीभ छाटली असल्यानेन बोलणाऱ्यांची परंपरा निर्माण होत आहे. या त्यांच्या निरीक्षणातून आगामी काळात वैचारिक आगडोंब निर्माण करण्याची क्षमता आहे. ज्यांचा या विधानावर आक्षेप असेल ते२०१४ पूर्वी आणि विशेषतः १९७५ साली लादल्या गेलेल्या आणीबाणीचा दाखला देत देशमुख यांचेम्हणणे खोडून टाकतील. माणसाची वृत्ती चिकित्सक असणे हे त्याच्या जिवंतपणाचेलक्षण मानलेजाते. परंतुभीतीपोटी मौन
राखलेगेलेतर देशातील लोकशाही आपण कायमची गाढूअसेअस्वस्थ विचार देशमुख यांच्या मनात डोकावले असतील असेवाटते. सत्तेची एक ताकद असतेतशी तिची मगरूरी असते. या अवगुणाचा अंश सर्वच पक्षात दिसून आला आहे. त्यामुळेमाणसाचा सत्ता उपभोगण्याचा उपजत गुण त्यास कारणीभूत असतो. आपलेमत, धोरण, भूमिका कितीही चुकीची असली तरी सत्तेच्या जोरावर ती लादण्याचा घाट सर्वपक्षीय नेतेमंडळी घालत आलेआहेत. त्यादृष्टीनेसर्वच दोषी आहेत. देशमुख यांनी भले२०१४ चा उल्लेख करताना १९७५ चा उल्लेख टाळला असेल पण त्यांच्या म्हणण्यात तथ्य आहे हेनाकारून चालणार नाही