ओडिशाचे आरोग्यमंत्री नाबा किशोर दास यांची पोलिस कर्मचाऱ्याने हत्या के ल्यामुळे खळबळ उडाली आहे. हा प्रकार मानसिक आरोग्य बिघडल्यामुळे झाला होता अशी प्राथमिक माहिती पुढे आली आहे. अर्थात आरोपीबाबत अशी भूमिका घेतल्याने त्याच्यावर होणाऱ्या कारवाईत सवलत मिळू शकते. हा अंतस्थ हेतू दर्लक् ु षित करुन चालणार नाही. त्यामुळे पोलिस तपास अधिक चोख केला जाईल, कारण शेवटी मृत्यू पावलेली व्यक्ती मंत्री होती आणि तीही मुख्यमंत्र्यांच्या जवळची. एकीकडे मानसिक आजाराचा मुद्दा पुढे आला असताना प्राथमिक तपासात वेगळीच माहिती पुढे आली आहे. अर्थात तिची रीतसर शहानिशा होईलच, परंतु मंत्री महोदयांनी म्हणे हल्लेखोर पोलिस कर्मचाऱ्याच्या नातेवाईकाला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते आणि ते पाळले न गेल्यामुळे रागाच्या भरात हा गुन्हा घडला. गुन्ह्यातील दोन्ही पवित्र्यांची सखोल चौकशी होऊन अंतिम निकाल दिला जाईल ही अपेक्षा आहे. आम्हाला मानसिक आरोग्याच्या मुद्यापेक्षा नोकरीचा मुद्दा गंभीर वाटत आहे. सर्वसाधारणपणे सत्ते असणाऱ्या मंडळींच्या हातात अमर्याद सत्ता असते आणि त्याचा ते जनतेच्या भल्यासाठी वापर करीत असतात. काही वेळा त्यात त्यांचा व्यक्तीगत स्वार्थ असतो. आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांना खुश ठेवण्यासाठी ते खोटी आश्वासने देत रहातात. प्रसंगी त्यांना खरोखरीच एखाद्यास उपकृ त करायचे असेल तर कायद्याला बगल देऊन ते अशक्य वाटणारे काम लिलया करीत असतात. अशी माहिती जनतेपासून लपून रहात नसते. त्यामुळे एखाद्या मंत्र्याने आपले काम केले नाही
तर ते त्यांच्या कर्तृत्वाबद्दल (?) शंका घेऊ लागतात. मग एखादा नाराज होतो आणि ओडिशात जे घडले तसे होऊन जाते! मंत्रीलोक सातत्याने नियमबाह्य वागू लागले की
त्यांच्या दरबारात गर्दी वाढू लागते. लाभार्थी मंडळी मंत्र्यांचे गुणगान करीत गावभर फिरु लागतात आणि ज्यांची कामे होत नाहीत ते मंत्र्यांची बदनामी करुन मोकळे होतात. प्रसंगी ही बदनामी पुढचे टोक गाठते आणि प्रसंग जिवावर बेततो. मंत्री असो वा सर्वसामान्य माणूस, त्याच्यावर असा प्राणघातक हल्ला होण्याचे समर्थन होऊ शकत नाही. ओडिशाच्या या प्रकरणात तर एका पोलिस कर्मचाऱ्यानेच कायदा हातात घेतला आहे. यातून समस्त मंत्र्यांना आणि अमर्याद सत्ता असणाऱ्या अधिकारी वर्गाला एक मोठा धडा शिकता येईल.कायद्याने जितके अधिकार दिले आहेत, तेवढेच वापरा आणि कायद्यासमोर सर्व समान असतात हे विसरु नका. जिथे याचे विस्मरण होते तिथे ददैुवाने नाहक मरण होते. ओडिशाच्या घटनेमुळे सत्ताधाऱ्यांचे डोळे उघडतील काय?