डीटीडीसीने दिला ठाणे शहर पोलिसांना दणका

प्रतीक मिश्राने काढलेल्या चार विकेट्सच्या जोरावर डीटीडीसीने अवघ्या दोन तासात गुरुवारी सेंट्रल मैदानावर ठाणे शहर पोलिसांना आठ गडी राखून 48व्या ठाणेवैभव आंतर ऑफिस क्रिकेट स्पर्धेत पराभूत केले. डीटीडीसीने ठाणे शहर पोलिसांचा 14.3 षटकांत 77 धावांत गुंडाळले आणि नंतर केवळ 9.4 षटकांत औपचारिकता पूर्ण करून जोरदार विजय नोंदविला.

या सामन्याचा सर्वोत्कृस्ट खेळाडू ठरला डीटीडीसीचा प्रतीक मिश्रा ज्याने त्याच्या संघासाठी गोलंदाजीची सुरुवात केली. या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात एक विकेट घेतली. त्याने दोन मेडन्ससह सहा षटके टाकली, 21 धावा दिल्या आणि चार गडी बाद केले. त्याला त्याचा सलामीचा गोलंदाज जोडीदार श्रेयस गुरवमध्ये एक सक्षम सहयोगी सापडला, ज्याने दोन मेडन्ससह तीन षटकांत 11 धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या.

दुसरीकडे, ठाणे शहर पोलिस, ज्या संघाने चार वर्षांनंतर या स्पर्धेत भाग घेतला, त्यांचे फलंदाज जास्त काही करू शकले नाहीत. डावखुरा फलंदाज गौरव राठोड याने 21 चेंडूत 22 धावा केल्या पण त्याला त्याच्या इतर सहकाऱ्यांची साथ लाभली नाही.

ठाणे शहर पोलीस

गोलंदाजांनी त्यांचे काम पूर्ण केल्यानंतर सामन्याच्या दुसऱ्या डावात जबाबदारी होती ती डीटीडीसीच्या फलंदाजांवर. धावांचा पाठलाग करताना सत्यलक्षा जैन (21 चेंडूत 25 धावा) आणि गौतम वाघेला (23 चेंडूत नाबाद 22 धावा) या सलामीच्या जोडीने महत्त्वपूर्ण योगदान दिले. योगेश क्षीरसागर आणि राठोड यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली परंतु डीटीडीसीचे अधिक नुकसान करण्यात अयशस्वी ठरले.

संक्षिप्त धावफलक: ठाणे शहर पोलीस 24.5 षटकांत 77 सर्वबाद (गौरव राठोड 22; प्रतीक मिश्रा 4/21) पराभूत वि. डीटीडीसी (सत्यलक्षा जैन 25; योगेश क्षीरसागर 1/17)