जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन सोहळा संपन्न

ठाणे शहरात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषद ठाणे, शिक्षण विभाग (माध्यमिक) आयोजित ५० वा विज्ञान प्रदर्शन सोहळा सन 2022- 23 हा सिम्बॉयसिस हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, बायपास रोड कौसा, शीळ, ता. जिल्हा ठाणे येथे नुकताच पार पडला.

मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मनुज जिंदल यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. जिंदल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन के ले. जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत ठाणे जिल्हयातील ५० शाळे तील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे. कार्यक्रमाची सुरूवात मान्यवरांच्या हस्तेदिप प्रज्वलन करून झाली. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या विद्यार्थ्यांनी स्वागत गीत म्हणून के ले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) ललीता दहितुले यांनी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांचे स्वागत के ले. कार्यकारी संचालक कमलराज देव, विस्तार अधिकारी मधुकर घोरड, सिम्बॉयसिस हायस्कूल व ज्नयुिअर कॉलेजच्या मुख्याध्यापिका स्हलता ने देव तसेच परीक्षक म्हणून उपस्थित प्राध्यापक कै लास देसले, डॉ. अं जली जाधव हे प्रदर्शन सोहळ्यास उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी तयार के लेले विविध नाविन्यपूर्ण मॉडेल विज्ञान प्रदर्शन माध्यमातून प्रदर्शित करण्यात आले आहेत. विज्ञान प्रदर्शन सोहळ्याचे सूत्रसंचालन करुणा गगे (बांगर) यांनी के ले.

“विज्ञान दृष्टीकोन नेहमी बदल समोर आणतो आणि आपल्याला बदलण्यास प्रवृत्त करतो. अं धश्रद्धेपासून दर ठे वतो ू म्हणून वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी कायम प्रयत्नशील असणे आवश्यक आहे”, असे श्री. जिंदल म्हणाले.