जिल्ह्यातील १८ मतदारसंघात २८१ नामनिर्देशनपत्रांचे वाटप

सहा उमेदवांरानी सादर केले अर्ज

ठाणे: ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज 18 विधानसभा मतदारसंघातून एकूण 281 नामनिर्देशन पत्रांचे उमेदवारांना वाटप करण्यात आले आहे. तर सहा उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज दाखल केले.

भिवंडी सहा, शहापूर 13, 136 – भिवंडी पश्चिम 36, भिवंडी पूर्व 22, कल्याण पश्चिम 20, मुरबाड 14, अंबरनाथ सहा, उल्हासनगर 10, कल्याण पूर्व 25, डोंबिवली नऊ, कल्याण ग्रामीण 28, मीरा-भाईंदर 19, ओवळा-माजिवडा 24, कोपरी-पाचपाखाडी 13, ठाणे 11, कळवा-मुंब्रा 16, ऐरोली शून्य आणि बेलापूर विधानसभा मतदारसंघात नऊ अर्ज असे एकूण 281 अर्जाचे वाटप करण्यात आले.

शहापूर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार अविनाश शिंगे यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी राहूल मुंडके यांच्याकडे सादर केला. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार वैजंता पावशे यांनी आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांच्याकडे दाखल केला. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार तृनेश देवळेकर यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी रमेश मिसाळ यांच्याकडे सादर केला. उल्हासनगर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार मनोज सयानी यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्याकडे सादर केला. कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून समता पार्टीचे उमेदवार सोयल शहा युनूस शहा शेख यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव म्हस्के-पाटील यांच्याकडे सादर केला. डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून राईट टू रिकॉल पार्टीचे उमेदवार निलेश सानप यांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी अमित शेडगे यांच्याकडे सादर केला.