उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी मीरा-भाईंदरमध्ये

भाईंदर: मीरा-भाईंदरमधील विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी होणार आहे.

भाईंदर पश्चिम येथील नागरी सुविधा क्षेत्र भूखंडावर मुलभूत सोयी-सुविधांचा विकास या योजनेतील निधीतून आणि विकासहक्क प्रमाणपत्राच्या मोबदल्यात महावीर भवन इमारत बांधणे कामाचा भुमीपुजन समारंभ, मिरारोड पूर्व आरक्षण क्र. 210/211 मधील हॉस्पीटल इमारतीचे भूमीपूजन, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील पशु-पक्षी उपचार केंद्र लोकार्पण, भाईंदर पश्चिम उड्डाणपूल खालील सी.सी.टी.व्ही. नियंत्रण कक्ष लोकार्पण, भारतरत्न उस्ताद बिस्मिला खाँ उर्दु शाळा, मिरागाव इमारत लोकार्पण, काशिमिरा उड्डाणपूला खालील संत रविदास महाराज उद्यानाचा लोकार्पण समारंभ कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवार 22 एप्रिल 2023 रोजी 12.30 वाजता मीरा-भाईंदर शहरात उपस्थित राहणार आहेत.

यावेळी उत्पादन शुल्क तथा पालकमंत्री शंभुराज देसाई, खा. राजन विचारे, आ. निरंजन डावखरे, आ. प्रताप सरनाईक आणि इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत.