सरपंच हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अटक करण्याची मागणी

अंबरनाथ : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्त्या करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक करा आणि मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशा मागणीचे निवेदन बदलापूर शहर आणि ग्रामीण सकल मराठा समाज मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने अंबरनाथ तहसिलदारांना देण्यात आले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली. या घटनेतील मारेकऱ्यांना आणि कट रचणाऱ्यांना अद्याप अटक करण्यात आली नाही. याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

हत्त्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मिकी कराड याच्यावर तातडीने गुन्हा दाखल करून त्याला त्वरित अटक करावी आणि कराड याला पाठीशी घालणाऱ्या धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी संघटनेच्या वतीने अविनाश देशमुख, संभाजी शिंदे, कालिदास देशमुख, सुहास पोखरकर, संतोष रायजाधव, अरुण चव्हाण, मनोज जाधव, सदानंद भोईर, सुधीर देशमुख आदी सकल मराठा समाज बांधवानी आज सोमवारी तहसीलदार अमित पुरी यांची भेट घेऊन त्यांना लेखी निवेदन दिले.