ठाणे : लॉरेन्स बिष्णोई टोळीकडून आमदार जितेंद्र आव्हाड यांनाही काही दिवसांपूर्वी धमकीचा फोन आला. त्यामुळे आव्हाड यांच्या जीवाला धोका असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आज वर्तक नगर पोलीस पोलीस ठाण्यात धाव घेत आव्हाडांची सुरक्षा वाढवण्याची मागणी केली. तसेच घराबाहेर सुरक्षा वाढवावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अजित पवार गटातील माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी लॉरेन्स बिष्णोई गँगने स्वीकारल्यानंतर आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी वर्तकनगर पोलिसांना एक पत्र देण्यात आले आहे. या पत्रात आमदार जितेंद्र आव्हाड यांना एप्रिल महिन्यात बिष्णोई गँगकडून जितेंद्र आव्हाड यांना धमकीचा फोन आल्याचे म्हटले आहे. हा फोन खंडणीसाठी करण्यात आला होता. जर खंडणी दिली नाही तर कफनची व्यवस्था करावी, असेही फोन करणाऱ्या व्यक्तीने तेव्हा धमकावले होते. ऐन लोकसभा निवडणुकीत जितेंद्र आव्हाड ठाण्यातील घरी असताना अनोळखी नंबरवरून एक फोन आला. त्यात फोन करणाऱ्या व्यक्तीने स्वतःला बिष्णोई गँगचा शार्पशूटर असल्याचा दावा केला होता. फोनवर बोलतांना आपले नाव रोहित गोदारा असे सांगत आपण हा फोन ऑस्ट्रेलियातून करीत असल्याचे सांगितले होते. दरम्यान,माजी आमदार बाबा सिद्धकी यांच्यावर गोळीबार करण्यात आल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आहे