ठाणे : मुंबई ते अहमदाबाद या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी आतापर्यंत तब्बल ७८ लाख क्युबिक मीटर काँक्रिटचा वापर झाला आहे. या कामासाठी दररोज दहा मजली १८ इमारती उभारता येतील, म्हणजे साधारण २० हजार घनमीटर काँक्रीटचा वापर केला जात आहे.
जपानमधील बुलेट ट्रेनच्या धर्तीवर मुंबई-अहमदाबाद दरम्यान ५०८ किलोमीटर लांबीच्या बुलेट ट्रेन प्रकल्पाचे काम सुरू आहे. यात १२ स्थानके, नदीवरील २४ पूल, आठ बोगदे आणि समुद्राखालून जाणा-या मार्गाचे काम सुरू आहे.
या कामासाठी दररोज दहा मजली १८ इमारती उभारता येतील, म्हणजे साधारण वीस हजार घनमीटर काँक्रीटचा वापर केला जात आहे. बुलेट ट्रेन प्रकल्पाचे महाराष्ट्र, गुजरात, दमण येथे भूसंपादन झाल्यानंतर या पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर भर दिला गेला आहे. मुंबई -अहमदाबाद बुलेट या प्रकल्पाची विभागणी ११ टप्प्यांमध्ये केली आहे.
वांद्रे कुर्ला संकुल, ठाणे, विरार, बोईसर, वापी, बिलिमोरा, सुरत, भरूच, बडोदा, आणंंद, अहमदाबाद आणि साबरमती या स्थानकांचीही कामे सुरू आहेत. याशिवाय गुजरातमधील अनेक नद्यांवरील पुलांची उभारणी झाली आहे. त्यासाठी आतापर्यंत ७८ लाख घनमीटर काँक्रीटचा वापर करण्यात आला आहे. आगामी काळात काँक्रिटचा दररोजचा वापर अगणित होणार असून, हा महाप्रकल्प संपल्यानंतर त्याची ‘गणती’ करण्यात येईल, असे ‘एनएचएसआरसीएल’कडून सांगण्यात आले.