ठाणे : ‘महानगर गॅस लिमिटेड’ने स्वयंपाकाच्या गॅसमध्ये (पीएनजी) आणि वाहनांसाठी असलेला ‘सीएनजी’ यांच्या दरांमध्ये काही दिवसांपूर्वी वाढ झाली असताना, ‘सीएनजी’च्या दरात अडीच रुपये /किलो अशी कपात केली आहे. त्याचा फायदा मध्यरात्रीनंतर संबंधित वाहनांना लागू होणार आहे. यामुळे ‘सीएनजी’साठी किलोमागे ८७ रुपये मोजावे लागणार आहेत.
पेट्रोलियम मंत्रालयाद्वारे पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढता-वाढे होत असताना त्याच्या तुलनेत सीएनजीचे दर मात्र किलोमागे ८७ रुपये मोजावे लागतील. ‘कंप्रेस्ड नॅचरल गॅस (सीएनजी) ची किंमत अडीच रुपयांनी कमी केले आहेत आणि पेट्रोलच्या वाढत्या दराच्या तुलनेत सुमारे 44टक्क्यांची आकर्षक बचत होणार आहे, असे एमजीएलच्या प्रवक्त्याने सांगितले.