लग्नासाठी प्रत्येकजण खास तयारी करत असतो. नववधू आणि वर महागाचे कपडे विकत घेतात. लग्न ठरलं की सगळ्यात आधी लग्नात कोणते कपडे घालणार याचा विचार केला जातो. नवीन ट्रेंड काय आहे हे पाहिलं जातं. वेगळं काहीतरी ट्राय करता येईल का याचा विचार येतो. लग्नात वधू-वराकडे सगळ्यांचं विशेष लक्ष असतं. त्यामुळे ठाण्यातील मार्केटमध्ये नवरदेवाच्या कपड्यांमध्ये तसेच त्यावरील अक्सेसरीज मध्ये नवीन ट्रेंड कसला सुरु आहे हे जाणून घेऊया.
लग्नातील कार्यक्रमाच्या थीमनुसार आता कपडे निवडले जातात. लग्नसमारंभ म्हटलं की 6-7 कार्यक्रम एकाचवेळी असतात म्हणून त्यानुसार कपडे घेतले जातात. मेहेंदीच्या कार्यक्रमाला मेहेंदी रंगाचा किंवा हिरव्या शेडचा ड्रेस निवडला जातो. हळदीच्या कार्यक्रमाला पिवळ्या शेडचे ड्रेस घेतले जातात. साखरपुड्याला डिझाईनर ड्रेस निवडले जातात. संगीतच्या कार्यक्रमाला गडद रंगाचे ड्रेस निवडले जातात. तर, लग्नाच्या दिवशी पेस्टल कलरच्या ड्रेसला सध्या पसंती आहे.
वागडस्
ठाण्यातील राम मारुती रोड येथे असलेल्या वागडस् या कपड्याच्या दुकानात नवरदेवासाठीच्या कपड्यांमध्ये वेगवेगळी खूप व्हरायटी उपलब्ध आहे. येथे साखरपुड्यानिमित्त इंडोवेस्टर्न कपडे आहेत. त्यामध्ये नवीन जोधपुरी कुर्ता जाकीट सध्या खूप ट्रेंडिंग आहे. या इंडोवेस्टर्न कपड्यावर मोत्याची माळ आणि डोक्यावर पुणेरी टोपी किंवा पेशवाई पगडी देखील उपलब्ध आहे. वागडस् येथे इंडो वेस्टर्न कपड्यांची रेंज १० हजार पासून ते २ लाखांपर्यंत आहे. जोधपुरी सूट १० हजार पासून ७५ हजार रु. पर्यंत आहे. कुर्ता आणि जॅकेट ६ हजार रु.पासून सुरु आहेत. त्याचबरोबर येथे नवरदेवाचे कपडे रेंटवर मिळतात व कपडे अल्टर करून मिळतील.
पत्ता : दुकान क्रमांक -1, राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम, 400602
————-
कस्बा
कस्बा या शॉप मध्ये ब्लेझर, टक्सीडो सूट, जोधपुरी, शेरवानी, इंडो वेस्टर्न, धोती सेट, कुर्ता सेट, मोदी जॅकेट सेट, सूटिंग, शर्टिंग असे विविध प्रकारचे कपडे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर येथे ग्राहकांच्या आवडीनुसार पाहिजे तसे कपडे कस्टमाइज्ड करून देखील मिळतात. सध्याच्या अपकमिंग ट्रेंडनुसार येथे संगीत या कार्यक्रमासाठी ओपन जॅकेट सेट, मेहेंदीच्या कार्यक्रमासाठी कुर्ता सेट आणि मोदी जॅकेट, हळदीच्या कार्यक्रमासाठी पिवळ्या रंगाचे कपडे, साखरपुडा निमित्त टक्सीडो सूट, जोधपुरी सूट आणि इंडोवेस्टर्न कपडे, फेरे या कार्यक्रमासाठी शेरवानी, रिसेप्शनसाठी फॉर्मल सूट उपलब्ध आहेत. तसेच शेरवानी सोबत दुपट्टा, मोजडी आणि माळ सुध्दा उपलब्ध आहे. येथे कपड्यांची रेंज ९९५/- पासून सुरु आहे तर एथनिक वेअर हे स्वस्त दरात उपलब्ध आहेत
पत्ता : राम मारुती रोड, नौपाडा, ठाणे पश्चिम, ४००६०१
————
एकदंत
एकदंत येथे लग्नासाठी पेशवाई ड्रेस, पुणेरी धोती सेट, बारबंदी धोती सेट, कुर्ता सेट यासारखे पारंपारिक कपडे तसेच बंडी जॅकेट, ब्लेझर सुट, टक्सीडो सूट, जोधपुरी सेट, नवाबी शेरवानी, इंडो वेस्टर्न सूट, ओपन जॅकेट सूट उपलब्ध आहेत. सध्या पेशवाई ड्रेस, पुणेरी धोती सेट, बारबंदी धोती सेटचा ट्रेंड असल्याचे शॉपचे मालक वत्सल बोरीचा यांनी सांगितले. तसेच या सर्व कपड्यांवर शोभतील असे पेशवाई पगडी, पुणेरी पगडी, फेटा, पुठ्ठा टोपी, फरवली टोपी, शॉल, माळा, आणि मोजडी या अक्सेसरीज उपलब्ध आहेत. येथे पेशवाई ड्रेसची रेंज ४९९९/-पासून पुढे, बारबंदी व धोती ५९९९/-पासून पुढे, पुणेरी व धोती सेट ४९९९/- पासून पुढे, जोधपुरी सेट ४९९९/- पासून पुढे, शेरवानी ६९९९/- पासून पुढे आणि नवाबी शेरवानी ५९९९/- पासून उपलब्ध
आहेत.
पत्ता : राम मारुती रोड, गार्डन स्टोअरच्या समोर, नौपाडा, ठाणे पश्चिम, 400602