एकाग्रता वाढवणाऱ्या बॉक्सिंगची ठाण्यात भरारी 

बॉक्सिंग हा एक बहुआयामी खेळ आहे जो शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक आरोग्यापासून ते भावनिक आरोग्यापर्यंत अनेक फायदे देतो. स्‍पर्धा करण्यासाठी आणि तंदुरुस्त राहण्‍यासाठी बॉक्सिंग सर्वसमावेशक समाधान प्रदान करते. हा एक असा खेळ आहे ज्यासाठी केवळ ताकदच नाही तर बुद्धिमत्ता, एकाग्रता आणि शिस्त देखील आवश्यक आहे. मूलभूत तंत्रे, नियम आणि आवश्यक उपकरणे समजून घेणे महत्वाचे आहे.

ठाणे बॉक्सिंग अकॅडमी 

ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ठाणे बॉक्सिंग अकॅडमीद्वारे बॉक्सिंगचे प्रशिक्षण दिले जाते. ठाणे स्टेशनपासून ही अकॅडमी जवळ असल्याने येथे ठाण्याव्यक्तिरिक्त इतर शहरातून येणाऱ्या मुलांना येणे- जाणे सोयीचे आहे. येथील प्रशिक्षक बॉक्सिंगचे संपूर्ण तांत्रिक प्रशिक्षण घेतलेले असून त्यामुळे योग्य ते प्रशिक्षण येथे दिले जाते. येथील अनेक विद्यार्थी बॉक्सिंगच्या जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देशस्तरीय अशा विविध स्पर्धांमध्ये सहभाग घेत असतात. येथे महिला बॉक्सर्ससाठी महिला कोचसुद्धा आहेत. ठाणेकरांचा या अकॅडमीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. अधिक माहितीसाठी संपर्क: +91 81081 46066

मी ठाणे कॉलेजमध्ये आता बारावीमध्ये शिकत आहे. मी वयाच्या १० व्या वर्षापासून बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. मला बॉक्सिंगची आवड हळूहळू लागली. लहानपणी मी खूप रागीट होतो, आता माझा राग बॉक्सिंगमुळे हळूहळू कमी झाला आहे. स्टेट, डिव्हिजन स्पर्धांमध्ये मी खेळलो आहे. आता ओपन नॅशनलसाठी बंगलोरलाही मी जाऊन आलो. बॉक्सिंग खेळायला लागल्यापासून काय खायला हवे, काय नको तसेच आराम कसा करावा आणि कुठे लक्ष द्यायचे ते समजले. स्व – संरक्षण करायला शिकलो. मला बॉक्सिंगमध्येच करिअर करायचे आहे.

ऋषभ जाधव – ठाणे बॉक्सिंग अकॅडमी

मी पोतदार कॉलेजमध्ये आता बारावीमध्ये शिकत आहे. मी वयाच्या बाराव्या वर्षापासून बॉक्सिंग शिकत आहे. मी लहानपणी फायटिंग स्पोर्टस् जास्त  प्रमाणात बघायचो. त्यामुळे माझ्या वडिलांनी मला बॉक्सिंग प्रशिक्षणासाठी क्लासला घातले. मी आत्तापर्यंत तीन वेळा राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये खेळलो आणि दोन वेळा ओपन स्टेट स्पर्धा खेळलो. मी बॉक्सिंगवर जास्त लक्ष देतो. बॉक्सिंग खेळल्यामुळे मला आनंद मिळतो. बॉक्सिंगचे अनेक फायदे मला जाणवत आहेत. भविष्यात बॉक्सिंगमध्येच करियर करायचे आहे.

पार्थ साखळे –  ठाणे बॉक्सिंग अकॅडमी

मी २०१३ पासून बॉक्सिंग शिकायला सुरुवात केली. सुरुवातीला मला बॉक्सिंगची भीती वाटायची, मी सरावात सात्यत वाढवले त्यामुळे माझी पंच बद्दलची भीती नाहीशी झाली. मी अनेक डीएसओ, राष्ट्रीयस्तरावरील स्पर्ध्यांमध्ये मेडल पटकावले आहेत. मी आता सध्या ठाणे बॉक्सिंग अकॅडमीमध्ये बॉक्सिंगचे प्रशिक्षण देते. मला बॉक्सिंग करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले. परंतु त्यावर मात करून मी आता बॉक्सिंगचे प्रशिक्षण देत आहे. बॉक्सिंगचे अनेक फायदे असून प्रत्येकाने बॉक्सिंग शिकले पाहिजे.

निशा गायकवाड –  प्रशिक्षक, ठाणे बॉक्सिंग अकॅडमी

मी बॉक्सिंगच्या प्रसारासाठी १९९३ साली ठाणे जिल्हा बॉक्सिंग संघटनेची स्थापना केली. गेल्या काही वर्षांपासून मी दादोजी कोंडदेव स्टेडियममध्ये बॉक्सिंग शिकवत आहे. त्याचप्रमाणे दरवर्षी ठाण्यातील हौशी बॉक्सर्ससाठी मी बॉक्सिंग कॅम्पचेही आयोजन करतो. आता पालकही सजग झाले आहेत. त्यामुळे त्यांना आपल्या मुलांचे हीत कशात आहे ते समजते. त्यामुळे ठाणे शहरात बॉक्सिंगला मागणी वाढताना दिसते. बॉक्सिंग हा नैसर्गिक खेळ सर्व वयोगटातील  मुले खेळू शकतात. बॉक्सिंगमध्ये सातत्य महत्वाचे आहे. पाहायला गेले तर मुलींचे प्रमाण या खेळात थोडे कमी आहे. हे प्रमाण वाढले पाहिजे. बॉक्सिंगमध्ये  करिअर करण्यासाठी चांगला वाव आहे.

मिलन वैद्य – अध्यक्ष , ठाणे डिस्ट्रिक्ट बॉक्सिंग असोसिएशन

——————————————————————————————————————————

एमएमए वॉरियर्स अकॅडमी  

ठाण्यातील वर्तकनगर भागात असलेल्या एमएमए वॉरियर्स या बॉक्सिंग प्रशिक्षण अकॅडमीला २०२४ मध्ये १० वर्ष पूर्ण झाली आहेत. येथे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील MMA फायटर्स आहेत जे तिथे शिकत असलेल्या मुलांचे वर्ग घेतात. जेणेकरून विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण मिळते. ही अकादमी ठाण्यातील पहिली व्यावसायिक बॉक्सिंग अकादमी आहे जी महत्वाकांक्षी एमएमए फायटर्सना प्रशिक्षण देते आणि बॉक्सिंग हे करिअर म्हणून निवडण्यासाठी एक योग्य व्यासपीठ देते. येथे बॉक्सिंग, किकबॉक्सिंग, jiu jitsu, स्ट्रेंथ ट्रेनिंग आणि स्व-संरक्षण प्रशिक्षण दिले जाते. जे आजच्या जगात महत्त्वाचे आहे. या अकॅडमीमधील सर्वच प्रशिक्षक राष्ट्रीय व आंतरारराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू आहेत. या अकॅडमीचे सदस्य व्यावसायिक फायटर आहेत. बॉक्सिंगचे अनेक फायदे आहेत. ते लक्षात घेता या अकॅडमीमध्ये ठाण्यातील अनेक मुले बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेत आहेत. एकूणच ठाणेकरांचा या अकॅडमीला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. बॉक्सिंग सोबतच ज्यांना वजन कमी करायचे आहे परंतु नियमित व्यायामशाळेचा कंटाळा आला आहे त्यांना MMA वॉरियर्स उत्तम पर्याय आहे.  अधिक माहितीसाठी संपर्क https://www.instagram.com/mmawarriors_official/  संपर्क क्रमांक  9004538091

बॉक्सिंगचा जास्तीत जास्त प्रसार करण्यासाठी मी ठाण्यात MMA वॉरिअर बॉक्सिंग अकॅडमी सुरु केली. मी गेली पंधरा वर्षे बॉक्सिंग शिकवत आहे. त्याचसोबत मी क्रॉसफिट ट्रेनर आणि आहारतज्ज्ञ देखील आहे. बॉक्सिंग क्षेत्रात अनेक करिअरच्या संधी उपलब्ध झाल्या असून भारतात बॉक्सर्सचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. बॉक्सिंगच्या मुख्य प्रवाहातील ओळख व्यावसायिक स्पर्धा, प्रायोजकत्व आणि समर्थन यासाठी संधी निर्माण करत आहे. केवळ ठाणेकरांनीच नाही तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अकॅडमीला पाठिंबा देऊन कौतुक केले आहे. सर्वांच्या प्रेमाने आणि पाठिंब्याने MMA वॉरियर्स MMA उद्योगात नक्कीच मोठे नाव निर्माण करेल.

मायकल परेरा –  मुख्य प्रशिक्षक, MMA वॉरियर्स

======================

जागेश्वर स्पोर्ट्स   

ठाण्यातील बाळकूम येथे असलेल्या जागेश्वर स्पोर्ट्स या दुकानात बॉक्सिंगसाठी लागणारे सर्व साहित्य उपलब्ध आहे. बॉक्सिंगसाठी लागणारे पंचिंग बॅग्स, बॉक्सिंग ग्लोव्हस, माऊथ गार्ड येथे बॉक्सिंग खेळाडूंना मिळतील.
कुठे : बाळकुम पाडा नंबर २