साडेसहा टक्क्याने मतदान वाढले
ठाणे: २०१४ पासून आजतागायत झालेल्या लोकसभा निवडणुकीत भिवंडी मतदारसंघात मतदानाचा टक्का वाढतच असून यंदा ५९.८९ टक्के मतदान झाले.
भिवंडी लोकसभा मतदारसंघात २००९ साली झालेल्या निवडणुकीत ६८.७१ टक्के, २०१४ मध्ये ५१.६१ टक्के, २०१९मध्ये ५३.०७ टक्के तर २०२४ मध्ये 59.89 टक्के मतदान झाले. यंदाच्या निवडणुकीत पुरुष मतदारांचे प्रमाण 60.86 टक्के, महिला मतदारांचे प्रमाण 58.77 टक्के तर इतर मतदारांचे प्रमाण 15.93 टक्के इतके आहे.
भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात तीन लाख 23,978 मतदारांपैकी दोन लाख 35,411 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 72.66 टक्के एवढे आहे.
शहापूर विधानसभा मतदारसंघात दोन लाख 79,137 मतदारांपैकी एक लाख 96,119 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 70.26 टक्के एवढे आहे.
भिवंडी पश्चिम मतदारसंघात तीन लाख 4,959 मतदारांपैकी एक लाख 68,245 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 55.17टक्के एवढे आहे.
भिवंडी पूर्व मतदारसंघात तीन लाख 36,110 मतदारांपैकी एक लाख 67,615 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 49.87टक्के एवढे आहे.
कल्याण पश्चिम मतदारसंघात चार लाख 138 मतदारांपैकी दोन लाख 11,983 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 52.98 टक्के एवढे आहे.
मुरबाड मतदारसंघात चार लाख 42,922 मतदारांपैकी दोन लाख 70,703 मतदारांनी मतदान केले. हे मतदान 61.12टक्के एवढे आहे.