येऊरमध्ये ट्रेकिंगसाठी गेलेल्या १३ मुलांवर मधमाशांचा हल्ला; तिघे गंभीर जखमी

आपत्ती व्यवस्थापन, टीडीआरएफ आणि पोलिसांकडून सुटका

ठाणे : येऊर येथे ट्रेकिंगकरिता गेलेल्या मुलांवर मधमाशांनी हल्ला केला असून त्यामध्ये तीन मुले गंभीर जखमी झाली आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाने जंगलात भरकटलेल्या या १३ मुलांची सुखरूप सुटका केली आहे.

आज सोमवारी दुपारी साडेबारा वाजता आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे मिळालेल्या माहितीनुसार संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, येऊर येथे ट्रेकिंगसाठी गेले असता मधमाशा चावल्याने भीतीमुळे तेथेच अडकले. ही माहिती मिळताच घटनास्थळी वर्तकनगर पोलीस स्थानकाचे पोलीस कर्मचारी व टीडीआरएफ जवान एक बससह पोहचले. दुपारी दीड वाजता वर्तकनगर पोलीस स्थानकाच्या पोलीस कर्मचाऱ्यांकडून व टीडीआरएफ जवानांकडून या मुलांची सुखरूप सुटका करण्यात आली. या मुलांना त्यांच्या आई-वडिलांच्या ताब्यात देण्यात आले.

ऋषी घोसाळकर राहणार चेंदणी कोळीवाडा, कोपरी, ठाणे, समर्थ मयेकर राहणार घणसोली, नवी मुंबई, प्रणव परब राहणार विक्रोळी, मुंबई, वरद बासा राहणार विक्रोळी, मुंबई, सोहम देशमुख राहणार वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे, कुणाल पानमंद राहणार घाटकोपर, मुंबई, तन्मय नाईक राहणार मुलुंड, मुंबई, रोहन घरुड राहणार मुलुंड, मुंबई, अलोक यादव राहणार कळवा, ठाणे, आर्य यादव राहणार कांजूरमार्ग, मुंबई अशी या मुलांची नावे असून ती सर्व १८ वर्षे वयाची आहेत.

यापैकी तिघांना क्रिटीकेअर रुग्णालय, ठाणे येथे दाखल करण्यात आले आहे.