या आयसीसी महिला टी-२० विश्वचषकातील त्यांचा तिसरा साखळी सामना बांगलादेश आणि वेस्ट इंडिज, गुरुवारी शारजाह येथे खेळतील. या सामन्यानंतर दोन्ही संघांकडे केवळ एक साखळी सामना शिल्लक राहील. स्कॉटलंडवर मात करत बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांनी दोन सामन्यांत एक विजय नोंदवला आहे. २०१६ टी-२० विश्वचषक विजेते वेस्ट इंडिज तसेच बांगलादेश, ज्यांनी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या नॉक आऊट फेरीत कधीही प्रवेश केला नाही, यांना उपांत्य फेरीसाठी पात्र होण्यासाठी हा सामना जिंकणे गरजेचे आज. जो संघ विजयी होईल त्याला दोन गुण मिळतील आणि त्या संघाची एकूण गुणसंख्या चार होईल.
आमने-सामने
बांगलादेश आणि वेस्ट इंडिज यांनी एकमेकांविरुद्ध तीन आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळले आहेत आणि ते सर्व वेस्ट इंडिजने जिंकले आहेत. हे सर्व सामने आयसीसी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचा भाग म्हणून खेळले गेले होते.
संघ
बांगलादेश: निगर सुलताना जोती (कर्णधार), नाहिदा अक्तर, मुर्शिदा खातून, शोर्ना अक्तर, रितू मोनी, शोभना मोस्तरी, राबेया खान, सुलताना खातून, फहिमा खातून, मारुफा अक्तर, जहानारा आलम, दिलारा अक्तर, ताज नेहार, शठी राणी, दिशा बिस्वास
वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेन, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शीमेन कॅम्पबेल, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचर, स्टॅफनी टेलर, शिनेल हेन्री, चेडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, मँडी मंगरु, नेरिसा क्राफ्टन
कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे
शोभना मोस्तरी: बांगलादेशची ही उजव्या हाताची फलंदाज आतापर्यंत या विश्वचषकात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने स्कॉटलंड आणि इंग्लंडविरुद्ध अनुक्रमे ३६ आणि ४४ धावा झळकावल्या आहेत.
फहिमा खातून: ही चतुर उजव्या हाताची ऑफस्पिनर बांगलादेशसाठी तिच्या मागील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात सर्वात यशस्वी गोलंदाजांपैकी एक होती. तिने चार षटकात १८ धावा देऊन दोन विकेट्स घेतल्या. त्याचबरोबर ती तिच्या संघाची दुसरी सर्वात किफायतशीर गोलंदाज होती.
कियाना जोसेफ: वेस्ट इंडिजच्या या डावखुऱ्या टॉप ऑर्डर फलंदाजाने स्कॉटलंडविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात केवळ १८ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह ३१ धावांची शानदार खेळी केली. तसेच या डावखुऱ्या फिरकी गोलंदाजाने एक षटक टाकले ज्यात तिने फक्त दोन धावा दिल्या.
ऍफी फ्लेचर: वेस्ट इंडिजच्या या उजव्या हाताच्या लेगस्पिनरने स्कॉटलंडविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात चार षटकांत २२ धावा देऊन तीन विकेट्स पटकावल्या. तिच्या चमकदार गोलंदाजीच्या कामगिरीसाठी तिने सामनावीराचा पुरस्कारही जिंकला.
हवामान
हवामान उबदार आणि दमट राहण्याची अपेक्षा आहे. जवळपास २९ अंश सेल्सिअस तापमान आणि ६१% आर्द्रता असेल.
सामन्याची थोडक्यात माहिती
तारीख: १० ऑक्टोबर २०२४
वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता
स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम
प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार