२३ प्रजातींचे परदेशी श्वान पाळण्यास बंदी: प्राणीमित्र संघटनेचा विरोध

ठाणे: एकूण 23 प्रजातींचे परदेशी श्वान पाळण्यास बंदी आहे, असे केंद्र सरकारचे आदेश बेकायदा आहे,असे मत ‘कॅम्प फाउंडेशन’चे संस्थापक, अध्यक्ष अ‍ॅनिमल वेल्फेअर ऑफिसर्स सुशांत तोमर यांनी व्यक्त केले आहे.

माणसांचे वेगवेगळे स्वभाव असतात तसेच श्वानांचेही स्वभाव असतात. श्वान हिंस्त्र की ममताळू हे देखील तो कोणत्या वातावरणात वाढतो त्यावर ठरते असेही ते म्हणाले. श्वानाचे पालनपोषण मालक कसे करतो यावर देखील त्याचे वागणे ठरते, असे तोमर म्हणाले.

याबाबत केंद्र सरकारने काढलेली नोटीस बेकायदा असल्याने दिल्ली आणि कर्नाटक उच्च न्यायालयाने ती रद्द केली आहे. परिणामी, श्वानांसाठी असलेल्या कायद्याच्या बेकायदेशीर ब्रीडिंगच्या प्रकारांना आळा बसेल. या कायद्यांच्या अंतर्गत जितके ब्रिडर आहे त्यांनी ‘स्टेट अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड’कडे नोंदणी केली पाहिजे आणि परवानाही घेतलाच पाहिजे पण तसे होताना दिसत नाही याकडेही त्यांनी अंगूलीनिर्देश केले.

महाराष्ट्रातील ‘अ‍ॅनिमल वेल्फेअर बोर्ड’नियमानुसार काम करीत नाही. त्यांच्याकडे तक्रार आली तरच ते पावले उचलतात. पाळलेल्या श्वानांना किती खायला मिळते, त्यांचा व्यायाम होतो का, त्यांना कसे ठेवले जाते, त्यांची ऊर्जा कशी वापरली जाते हे या त्यांना पाळणा-या पालकांची भूमिका महत्वाची आहे. उद्या देशी श्वान चावतात अशा तक्रारी आल्या तर त्यांच्यावर बंदी आणणार का? तसेच परदेशी श्वानांना पाळणारे पालक त्यांना मारतात आणि दिवसभर बांधून ठेवतात. त्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट होतो. विदेशी श्वानांमध्ये ऊर्जा जास्त असते. त्यामुळे त्यांच्याकडून व्यायाम करून घेतला पाहिजे, त्यांना विविध खेळांमध्ये रमवले पाहिजे, अशा श्वानांचे पालनपोषण नीट करत नसल्यामुळे त्यांचा स्वभाव रागीट होतो. ठाणे शहरात परदेशी श्वान पाळणारे प्रेमी खूप आहेत, अशी माहिती चर्चेत दिली. शिवाय संबंधित ‘बोर्ड’ने श्वानांची नसबंदी ऑपरेशन करून घेण्यास सांगितले आहे.