अंबरनाथच्या कानसईचा रस्ता विद्युत रोषणाईने उजळला

अंबरनाथ: दीपावलीच्या शुभ मुहूर्तावर अंबरनाथच्या पूर्वेकडील कानसई भागातील मोहनपुरम परिसर आकर्षक विद्युत रोषणाइने उजळून निघाला आहे.

अंबरनाथच्या पूर्व भागातील मोहनपूरम परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष कुणाल भोईर, माजी नगरसेविका अपर्णा भोईर आणि सहकाऱ्यांच्या संकल्पनेतून दिवाळीमध्ये गेल्या चार वर्षांपासून आकर्षक विद्युत रोषणाई केली जाते. धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर परिसरातील नागरिकांच्या उपस्थितीत “सण उत्सवाचा , सण प्रकाशा”चा शुभारंभ करण्यात आला.