अंबरनाथला घंटागाड्या रस्त्यावर; कचरा गेला डंपिंग ग्राऊंडवर

अं बरनाथ: अं बरनाथमधील कचरा वाहतूक करणाऱ्या ठे के दाराचे थकीत देयक देण्याबाबत आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर गेल्या चार दिवसांपासून बंद असलेल्या घंटागाड्या रस्त्यावर धावू लागल्या आणि साचलेला कचरा उचलून नेण्यास रविवारी सुरुवात झाली.

गेल्या समु ारे 10 महिन्यांपासून घंटागाडी ठे के दारचे बिल अदा न के ल्यानेघंटागाडी कामगारांनी घंटागाड्या बंद के ल्या होत्या. गेल्या चार दिवसांपासून घंटागाडी बंद
असल्याने शहरात सर्वत्र कचऱ्याचे साम्राज्य पसरले होते. इमारतींमध्ये देखील कचरा साचला असल्याने दुर्गंधी पसरू लागली होती. अखेर नगरपालिके ने समझोता करून बिल अदा करण्याच्या आश्वासन मिळाल्यानंतर घंटागाडी सुरू करण्यात आली आहे.

अं बरनाथ शहरात दररोज तब्बल १२० मे. टन घनकचरा घंटा गाडीमार्फत उचलला जातो. मात्र मागील चार दिवसांपासून शहरातील कचरा उचलला जात नव्हता. नगरपालिके ने संबंधित कचरा ठे के दाराचे मागील दहा महिन्यापासूनचे बिल अदा न झाल्याने घंटागाडीच्या कामगारांनी पगार मिळत नसल्याने व डिझेल पंपावर थकबाकी वाढल्याने डिझेल मिळणे बंद होऊन अखेर घंटागाडी बंद करण्यात आली होती.

नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ यांच्या आदेशाने आरोग्य अधिकारी संदीप कांबळे यांनी संबंधित ठे के दारासोबत बोलणी करून व थकीत बिल अदा होण्यास आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर रविवार पासून संपावर गेलेल्या घंटागाडी सुरू करण्यात आल्याचे आरोग्य अधिकारी संदीप कांबळे यांनी सांगितल.