मुंब्र्यातील हत्या प्रकरणात १४ वर्षांनी मिळाला न्याय

आरोपीला आजीवन कारावास

ठाणे : मुंब्रा येथे १४ वर्षांपूर्वी घडलेल्या हत्येच्या घटनेत अखेर न्याय मिळाला आहे. ही घटना ०३ डिसेंबर २०१० झाली होती. ट्रस्टींच्या जागेवरुन झालेल्या वादातून ही घटना झाली होती.

कौसा जामा मस्जिदचे ट्रस्टी अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे आणि मलीक सिकंदर सुरमे, लियाकत ढोेले यांच्या ट्रस्टीच्या जागेवरुन असलेल्या वादातून अब्दुल गणी अब्दुल मजिद डोंगरे व शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे यांनी कट रचला आणि मलीक सिकंदर सुरमे व लियाकत ढोले यांच्यावर जिवघेणा हल्ला केला. त्यात मलिक सिकंदर सुरमे हे मृत झाले होते.

या घटनेबाबत मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचा प्राथमिक तपास मुंंब्रा येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही.एन.कारकुड केला होता. त्यानंतर गुन्हे शाखा घटक एक ठाणे पोलिसांनी तपास करुन भक्कम पुरावे गोळा करुन दोषारोपपत्र न्यायालयात सादर केले होते.

या गुन्ह्याची सुनावणी न्यायाधीश वसुधा यांनी घेऊन गुन्ह्यातील आरोपी शाहिद गुलाम मुस्तफा सुरमे (४५) याला २५ सप्टेंबर २४ रोजी आजीवन सश्रम कारावास आणि १३ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

या गुन्ह्याच्या संदर्भात सरकारच्या वतीने सरकारी अभियोक्ता वर्षा चंदने, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (गुन्हे शाखा, घटक १) ठाणे येथील अधिकारी, तपासी अधिकारी, पोलीस निरीक्षक सादिक (गुन्हे अन्वेषण विभाग), हवालदार गिरीश पुराणिक, राज्य गुन्हे अन्वेषण विभाग आणि हवालदार विद्यासागर कोळी, मुंब्रा यांनी न्यायालयात ठोस पुरावे सादर केले आणि त्यामुळे या गुन्ह्ंयातील आरोपींना दोषी ठरवण्यात यश आले.