ठाण्यात कोरोनाचे सक्रिय रुग्ण शंभराखाली

ठाणे: शहरातील नवीन कोरोना रूग्णवाढ कमी झाली आहे. आज चार नवीन रुग्णांची भर पडली तर सक्रिय रुग्णांचा आकडा १००च्या आत आला आहे.

विविध रुग्णालयात आणि घरी उपचार घेत असलेल्या रूग्णांपैकी १६जण आज रोगमुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत एक लाख ९५,०८०रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्णालयात आणि घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या काही दिवसांपूर्वी १५०च्या पुढे गेली होती, ती संख्या आज ९२वर आली आहे. आत्तापर्यंत २१६४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

महापालिका प्रशासनाने काल शहरातील २५५ नागरिकांची चाचणी घेतली होती. त्यामध्ये अवघे चार जण बाधित मिळाले आहेत. आत्तापर्यंत २५ लाख ४२,९४७ ठाणेकरांची चाचणी घेण्यात आली असून त्यामध्ये आत्तापर्यंत एक लाख ९७,३३६ रूग्ण बाधित सापडले.