कल्याण: अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि हत्या प्रकरणी आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला आज कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 2 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण जिल्हा सत्र न्यायालयात न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांच्यासमोर आरोपी विशाल गवळी आणि त्याची पत्नी साक्षी गवळी यांना हजर केले असता आज न्यायालयाने या दोघांना २ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
कल्याण पूर्व येथील नराधम आरोपी विशाल गवळी याला कल्याण न्यायालयातून ठाणे येथे नेण्यात आले असून आणि त्याची पत्नी साक्षी गवळी हिला कोळसेवाडी पोलिस स्टेशन येथे ठेवण्यात आले आहे. आता पोलिस तपासात आणखी कोण कोणत्या गोष्टी समोर येतात हे पहावे लागेल.