४७ वी ठाणेवैभव करंडक स्पर्धा
ठाणे : ‘ठाणेवैभव’ आणि स्पोर्टींग क्लब कमिटी, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सेंट्रल मैदानावर सुरु असलेल्या ४७ व्या ठाणेवैभव करंडक आंतर कार्यालयीन क्रिकेट स्पर्धेच्या आज झालेल्या ‘क’ गटातील एकतर्फी लढतीत अभ्युदय बँकेने व्होल्टासची ६९ धावसंख्या एक विकेटच्या मोबदल्यात पार करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
ऑफ स्पिनर संजू राऊतने वोल्टासच्या चार फलंदाजांना २० धावांच्या मोबदल्यात तंबूत परत पाठवून अभ्युदय बँकेच्या विजयाचा पाया रचला. आघाडीवीर सतीश राणेने ६९ धावांचा पाठलाग करताना ३८ चेंडूत सात चौकारांसह नाबाद ४७ धावांची झंजावाती खेळी केली.
संक्षिप्त धावफलक
व्होल्टास २९.४ षटकात ६९ (क्लिंटन डिसोझा १५, संजू राऊत ७-२-२०-४, जालिंदर लाळगे ७-३-१८-२, प्रशांत कुपेकर ७-१-१३-१, सचिन तांबे १. ३-०-६-१) पराभूत विरुद्ध अभ्युदय बनाक ११. १ षटकात १ बाद ७० (सतीश राणे नाबाद ४७, सचिन टेम्बे १६, अझरुद्दीन खान १-०-४-१)