चिमुरड्यांनी फुलले समर वंडरलँड

पूर्वेश सरनाईक यांच्याकडून आयोजन

ठाणे: सध्या लहान मुलांना शाळेला सुट्टी असल्याने त्यांना एक विरंगुळा मिळावा व आनंदाचे क्षण घालवता यावेत, त्यांच्यातील कला गुणांना वाव मिळावा म्हणून युवा नेते पूर्वेश सरनाईक यांच्याकडून घोडबंदर येथे ‘समर वंडरलँड’ फेस्टिवल आयोजित करण्यात आले आहे.

काल गुरुवारी घोडबंदर आदिवासी पाड्यातील लहान मुलांच्या हस्ते या आगळ्या वेगळ्या फेस्टिव्हलचे दिमाखात उदघाटन झाले. पहिल्या दिवशी तुफान प्रतिसाद या समर वंडरलँडला मिळाला असून २३ एप्रिल पर्यंत हे समर वंडरलँड चालणार आहे.

काल २० एप्रिल रोजी या कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. घोडबंदर रोड येथील आदिवासी पाड्यातील लहान मुलांच्या हस्ते फीत कापून उदघाटन झाले. या लहान मुलाना सुरुवातीला गेम झोन मध्ये गेम्स खेळायला दिले तसेच त्यांना खाद्याच्या स्टॉल्स वरील विविध पदार्थांचा व कोल्ड्रिंकचा त्यांनी आस्वाद घेतला.
गुरुवार असूनही मोठ्या प्रमाणावर नागरिक या फेस्टिवलला भेट देत असल्याचे पहिल्या दिवशी दिसले. रविवार २३ एप्रिलपर्यंत हे फेस्टिवल चालणार आहे. समीर अँड बँड यांनी आपल्या संगीताने नागरिकांना पहिल्या दिवशी मंत्रमुग्ध केलं. चारही दिवस म्युजिक ही असणार आहे.