ठाणे : दिव्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली जात नसल्याचा आरोप करत भाजपा पालिका आयुक्त अभिजित बांगर यांना ११० अनधिकृत बांधकामांच्या छायाचित्रांचा देण्यात येणार आहे. येत्या २० जुलै रोजी सहाय्यक आयुक्तांच्या विरोधात आंदोलन करण्यात येणार आहे.
दिवा शहरात सुरू असणाऱ्या अधिकृत बांधकामांवर कोणतीही कारवाई न करता स्थानिक प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे नागरिकांना पिण्याचे पाणी, रस्ते, गटारे यासारख्या पायाभूत सुविधांना मुकावे लागत असून केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी धोरणाला ठाणे महापालिका हरताळ फासला जात असल्याचा आरोपही भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
सहायक आयुक्त निष्क्रिय?
माजिवडे-मानपाडा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रितमकुमार पाटील यांना दिवा प्रभाग समितीचा प्रभार देण्यात आला आहे. मात्र माजिवडे-मानपाडा प्रभाग हद्दीत ज्याप्रमाणे अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले आहे, त्याचप्रमाणे दिवा प्रभाग हद्दीतही भर पावसात बेकायदेशीर बांधकामे सुरू आहेत. दिव्यात साबे रोड येथे दिवा हायस्कूलच्या अलीकडे, भाजपा कार्यालयासमोर इमारतीचे बेकायदा बांधकाम सुरू आहे. याबाबत तक्रार करूनही श्री. पाटील यांनी नेहमीप्रमाणे कानाडोळा केला आहे.