ठाणे: ठाण्यातील संजय गांधी उद्यान परिसरातील एक नर बिबट्या दिवा-वसई मार्गावर येऊन रेल्वेच्या धडकेत ठार झाल्याची घटना आज पहाटे 4 च्या सुमारास घडली.
या बिबट्याची नखे, दात आणि इतर महत्वाचे अवयव सुस्थितीत आढळून आले आहेत. या अपघातात बिबट्याचे पाय तुटले असून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे बोलले जात आहे. शवविच्छेदनासाठी त्याचे शव बोरीवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील पशू वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले आहे.
हा नर बिबट्या सी 45 असल्याची ओळख पटली असून तो 10 जानेवारी 2022 रोजी विहार चौकीजवळील कॅमेर्यात कैद झाला होता. शवविच्छेदनानंतर त्याला अग्नी देण्यात आला.