मराठे ज्वेलर्सचे दुकान लुटणारी टोळी गजाआड

* २८ लाखांहून अधिक मुद्देमाल हस्तगत

ठाणे : नौपाडा पोलिसांच्या हद्दीतील वामन शंकर मराठे ज्वेलर्स हे दुकान लुटणा-या पाच जणांच्या टोळीला ७२ तासांत गजाआड करण्याची कामगिरी नौपाडा पोलिसांनी गुरुवारी केली आहे.

आरोपींकडून २८ लाख रुपयांहून अधिक मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना २१ डिसेंबर रोजी अटक केली असून त्यांचा पोलीस रिमांड मंजूर झाला आहे. या गुन्ह्यातील आरोपींचा पूर्वेइतिहास पाहता त्यांच्यावर गुजराथ आणि राजस्थानमधील पोलीस ठाण्यांत चोरीचे गुन्हे दाखल आहेत. हे आरोपी २४ ते ३५ या वयोगटातील आहेत.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १७ डिसेंबर रोजी १.५० ते ४.३० वाजता अनोळखी व्यक्तींनी दुकानाच्या प्रवेशद्वाराचा कडी-कोयंडा तोडून आणि शटर उचकटून त्यावाटे आतमध्ये प्रवेश केला आणि २८ लाख ७७,४९० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले, म्हणून नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे वरिष्ठांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेनुसार सहा. पोलीस आयुक्त १ (गुन्हे) तथा प्रभारी अधिकारी खंडणी विरोधी पथक शेखर बागडे यांनी विशेष पथके तयार केली होती. खंडणी विरोधी गुन्हे शाखा, ठाणे शहर यांनीही मध्यवर्ती गुन्हे कक्ष यांच्या मदतीने गुन्ह्यातील आरोपींबाबत कोणतेही धागेदोरे आणि सुगावा नसताना सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विष्लेषणाद्वारे व अतिशय कौशल्यपूर्व आरोपींचा तपास केला.

केलेल्या मालाच्या चोरीपैकी ४८३ ग्रॅम वजनाचे सोेन्याचे दागिने, साडेपाच किलो वजनाची चांदीची नाणी, भांडी, इमिटेशन ज्वेलरी व अन्य, मोबाईल असा एकूण २९ लाख १५,३४० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला,