बसमध्ये ३५ जण; पाच जण जखमी
पुणे: पुणे जिल्ह्यात भीमाशंकर-कल्याण एसटी बस उलटून भीषण अपघात झाला आहे. या अपघातात पाच प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात पुणे जिल्ह्यातील गिरवली गावाजवळ झाला आहे.
अपघातातील जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. अपघात भीषण सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मिळालेल्या अधिक माहितीनुसार, भीमाशंकर येथे जाणारी एसटी बस (एम एच १४ बी टी १५८२) गिरवली गावच्या हद्दीत पुलावरून खाली कोसळल्याची घटना सकाळी नऊच्या सुमारास घडली आहे. या अपघातात एसटी बसमधील पाच प्रवासी जखमी झाले असून इतर काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.
बसमध्ये एकूण 35 प्रवासी होते घटनेची माहिती कळताच स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासन, रुग्णवाहिका चालक यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना घोडेगाव येथील ग्रामीण रुग्णालय दाखल केले असल्याची माहिती घोडेगाव पोलिसांनी दिली.
अपघात होताच 108 नियंत्रण कक्षाला फोनवरुन माहिती मिळाली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून तातडीने पाच रुग्णवाहिका अपघातस्थळी रवाना करण्यात आल्या. जिल्हा प्रशासनाचे अधिकारी अपघातस्थळी दाखल झाले आहेत. अपघातग्रस्तांना आवश्यक ती मदत करण्यात येत असल्याचेही जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. बसला झालेल्या अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या बसमध्ये एकून 35 प्रवासी होते. त्या सगळ्या प्रवाशांसाठी ही सकाळ धोक्याची ठरली असती मात्र नशीब बलवत्तर म्हणून सगळ्यांचे जीव वाचले.