ठाणे: घरपट्टी नावे करून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या खर्डी ग्रामपंचायतीच्या उप सरपंचाला अटक करण्यात आली आहे. यामुळे शहापूर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
मोसिम शेख असे उप सरपंचाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार याने शहापूर तालुक्यातील खर्डी गाव येथे घर खरेदी केले असून या घराची घरपट्टी नावे करून देण्यासाठी उप सरपंच मोसिम शेख (३७) यांनी तक्रारदाराकडे ३० हजर रुपयांची लाच मागितली होती. याबाबत तक्रारदाराने १३ मे २०२५ रोजी लाचलूचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.
या तक्रारीनुसार पथकाने सापळा रचून शेख यांना ३० हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आली.