विनोद कांबळीला डिस्चार्ज, हॉस्पिटलमध्येच केली फलंदाजी

ठाणे: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची प्रकृती खालावल्याने त्याला भिवंडीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आता दहा दिवसांच्या उपचारानंतर त्याला डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यावेळी त्याने भारताची जर्सी घालून रुग्णालयाच्या व्हरांड्यात फलंदाजी केली.

विनोद कांबळीने नववर्षात नागरिकांनी दारु व इतर नशा यापासून दूर राहावे, असा संदेश दिला आहे. कोणतेही व्यसन आयुष्य उद्ध्वस्त करु शकते. तसेच लवकरच मैदानात परतणार असल्याचेही त्याने म्हटले आहे. रुग्णालयातही त्याने भारतीय क्रिकेट संघाची जर्सी घालून बॅट घेऊन नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. तसच यावेळी त्यानंएलएलने टीम इंडियाची जर्सी घालून फलंदाजीही केली.

2024 च्या डिसेंबर महिन्यात त्याची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याला लघवीचा त्रास होत होता आणि शरीरात पेटकेही येत होते. नंतर त्याच्या मेंदूमध्ये रक्ताच्या गुठळ्याही झाल्याचे आढळून आले. याआधीही तो त्याच्या आरोग्याशी संबंधित समस्यांमुळे चिंतेत होता.