आ. संजय केळकर यांना पुढारी महामुंबई आयकॉन पुरस्कार

ठाणे : दैनिक पुढारी आयोजित ‘पुढारी महामुंबई आयकॉन गौरव कर्तुत्वाचा अभिमान महाराष्ट्राचा’ या कार्यक्रमात आमदार संजय केळकर यांना पुढारी महामुंबई आयकॉन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या हस्ते पुढारी विशेष अंकाच्या पुरवणीचा प्रकाशन सोहळा पार पडला.

या कार्यक्रमास जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, भाजपाचे ठाणे शहर अध्यक्ष संजय वाघुले, राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे शहर अध्यक्ष आनंद परांजपे, परिवहन समिती सदस्य विकास पाटील, ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ दा .कृ. सोमण आदी उपस्थित होते.