एमएमआरडीए’च्या ‘मेट्रो चार’ तुळई बदलण्यासाठी लागले १० तास

प्रत्येकी १०० टन वजनाच्या चार तुळई

ठाणे : वडाळा, ठाणे कासारवडवली मेट्रो चार आणि कासारवडवली ते गायमुख मेट्रो चार मार्गिंकांंवरील एक आव्हानात्मक आणि अत्यंत अवघड काम पूर्ण करण्यासाठी नुकतेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए)यश आले आहे.

‘मेट्रो चार’ आणि ‘मेट्रो चार एक’या मार्गिकांवरील कापूरबावडी येथे अंतर बदल स्थानकाच्या कामांच्या अंतर्गत चार तुळई यशस्वीपणे बसविण्यात आल्या आहेत. प्रत्येकी 100 टन वजनाच्या चार तुळई बदलण्यासाठी आठ तास लागले आणि बदल करण्याकरीता ‘एमएमआरडीए’चे संबधित वरिष्ठ अधिकारी व अधिका-यांसह ३० ते ३५ हून अधिक कर्मचारी झटत होते. हे काम हातावेगळे करण्यासाठी आठ ते १० तास लागले होते,अशी माहिती अधिका-यांनी दिली.

कापूरबावडीच्या पुढे असलेल्या तत्त्वज्ञान विद्यापीठ जंक्शनवरील हे स्थानक दुहेरी रचनेचे आहे. ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो 5 मार्गावर जोडणारे हे महत्त्वाचे एक स्थानक आहे. या स्थानकाची विविध लहान-मोठी कामे वेगाने पूर्ण करण्यात येणार आहेत. दरम्यान, तुळई बसविण्याच्या कामांच्या दरम्यान घोडबंदर रोडवरील अवजड वाहतूक नियंत्रित करूनच हे काम पूर्ण करण्यात आले आहे.

सध्या पायलिंगची, पाईल कॅमची कामे, पियरची कामे आणि वायडक्ट व स्टेशनची आणि अ‍ँटी क्रॅश बॅरिअर आदी कामे करण्याचे बाकी आहे, असे प्राधिकरणाच्या सूत्रांनी सांंगितले.

कासारवडवली मेट्रो ४ हा मार्ग ३२.३२ किमी लांबीचा उन्नत आहे. या मार्गात एकूण ३० स्थानके असणार आहेत. कागदोपत्री या मेट्रोचा खर्च १४,५४९ कोटी रुपये आहे. बरीच कामे रेंगाळलेली असल्यामुळे १४ हजार कोटींहून अधिक खर्च होण्याची दाट शक्यता एका अधिका-याने व्यक्त केली.