सुरक्षेचा संदेश देणाऱ्या बिअर बाटलीच्या प्रतिकृतीने लक्ष वेधले!

वाहतूक पोलिसांची अनोखी जनजागृती

ठाणे: यंदा ठाणे वाहतूक पोलिस आणि दोन वॉर्डन नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह सुरक्षिततेचे संदेश वाहनचालकांना देत होते. यावेळी ड्राईव्ह सेफ असा संदेश असलेल्या बिअर बाटलीची प्रतिकृती ठाणेकरांचे लक्ष वेधत होती.

वाहतूक पोलीस उपायुक्त, चार सहाय्यक आयुक्त, १७ पोलीस निरीक्षक, ३७ एपीआय व उपनिरीक्षक हे १७ युनिट्सवर आणि ८५ ठिकाणी तैनात झाले होते, सर्व चालकांना सुरक्षिततेचा संदेश देत होते.

या मोहिमेचा उद्देश वाहन चालकांना मद्यपान करून वाहन चालवू नये आणि त्यांना प्रोत्साहन देऊन रस्ता सुरक्षेला चालना देण्याचा होता. ट्रॅफिक पोलिस हे चालकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतानाच सुरक्षित ड्रायव्हिंगच्या वचनबद्धतेचे बँड वितरित करण्यात येत होते. यावेळी ड्राईव्ह सेफ असा संदेश लिहिलेली बिअर बाटलीची प्रतिकृती साऱ्यांचे लक्ष वेधत होती.