जिल्ह्यातील १८ मतदारसंघांत ४१७ अर्ज वैध तर ७८ अवैध

ठाणे: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी ठाणे जिल्ह्यातील एकूण 18 विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांच्या अर्जाची छाननी प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. या छाननी प्रक्रियेत 18 विधानसभा मतदासंघात एकूण 381 उमेदवारांनी 495 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 417 नामनिर्देशन अर्ज वैध तर 78 अर्ज अवैध ठरले आहे.

प्रत्येक विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन अर्जाची छाननी उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष करण्यात आली. नामनिर्देशन पत्र दाखल केलेल्या उमेदवारांना 4 नोव्हेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत आपला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहे.

भिवंडी ग्रामीण मतदारसंघात एकूण 13 उमेदवारांनी 15 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 13 नामनिर्देशन अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले आहे..शहापूर मतदारसंघात एकूण 19 उमेदवारांनी 28 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 13 नामनिर्देशन अर्ज वैध तर 15 अर्ज अवैध ठरले आहे. भिवंडी पश्चिम मतदारसंघात एकूण 29 उमेदवारांनी 45 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 35 नामनिर्देशन अर्ज वैध तर 10 अर्ज अवैध ठरले आहे. भिवंडी पूर्व मतदारसंघात एकूण 23 उमेदवारांनी 30 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 19 नामनिर्देशन अर्ज वैध तर 11 अर्ज अवैध ठरले आहे.

कल्याण पश्चिम मतदारसंघात एकूण 33 उमेदवारांनी 38 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 35 नामनिर्देशन अर्ज वैध तर तीन अर्ज अवैध ठरले आहे.

मुरबाड मतदारसंघात एकूण 16 उमेदवारांनी 20 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 15 नामनिर्देशन अर्ज वैध तर पाच अर्ज अवैध ठरले आहे. अंबरनाथ मतदारसंघात एकूण 25 उमेदवारांनी 33 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 30 नामनिर्देशन अर्ज वैध तर तीन अर्ज अवैध ठरले आहे. उल्हासनगर मतदारसंघात एकूण 30 उमेदवारांनी 36 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 29 नामनिर्देशन अर्ज वैध तर सात अर्ज अवैध ठरले आहे.

कल्याण पूर्व मतदारसंघात एकूण 27 उमेदवारांनी 34 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 28 नामनिर्देशन अर्ज वैध तर सहा अर्ज अवैध ठरले आहे. डोंबिवली मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांनी 13 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 13 नामनिर्देशन अर्ज वैध तर शून्य अर्ज अवैध ठरले आहे. कल्याण ग्रामीण मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 18 नामनिर्देशन अर्ज वैध तर शून्य अर्ज अवैध ठरले आहे.

मीरा-भाईंदर मतदारसंघात एकूण 25 उमेदवारांनी 37 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 35 नामनिर्देशन अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले आहे. ओवळा-माजिवडा मतदारसंघात एकूण 17 उमेदवारांनी 25 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 23 नामनिर्देशन अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले आहे. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघात एकूण 14 उमेदवारांनी 18 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 16 नामनिर्देशन अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले आहे. ठाणे मतदारसंघात एकूण 12 उमेदवारांनी 19 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 17 नामनिर्देशन अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरले आहे. कळवा मुंब्रा मतदारसंघात एकूण 25 उमेदवारांनी 33 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 29 नामनिर्देशन अर्ज वैध तर चार अर्ज अवैध ठरले आहे.

ऐरोली मतदारसंघात एकूण 22 उमेदवारांनी 26 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 23 नामनिर्देशन अर्ज वैध तर तीन अर्ज अवैध ठरले आहे. बेलापूर मतदारसंघात एकूण 25 उमेदवारांनी 27 नामनिर्देशन अर्ज दाखल केले आहेत. त्यापैकी 26 नामनिर्देशन अर्ज वैध तर एक अर्ज अवैध ठरला आहे.