नरेंद्र मेहतांच्या उमेदवारीवर गीता जैन यांचा हल्लाबोल

मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. या यादीतील एकूण दोन उमेदवारांची नावे पक्षाने जाहीर केली आहेत.

मुंबई महानगर प्रदेशातील मीरा-भाईंदरची जागा भाजपकडे गेली आहे. येथून नरेंद्र मेहता यांना पक्षाने उमेदवारी दिली आहे. यापूर्वी मीरा-भाईंदरच्या महापौरपदी असलेल्या गीता जैन यांना तिकीट मिळणार असल्याची चर्चा होती.

मुख्यमंञी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर ज्या-ज्या आमदारांनी त्यांना साथ दिली होती, त्यांचे तिकीट कापणार नाही, त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी ही एकनाथ शिंदे यांनी उचलली होती. पण आता शिंदे यांना समर्थन देणाऱ्या मीरा-भाईंदरच्या विद्यमान आमदार गीता जैन यांचेही तिकीट कापले आहे. त्यामुळे नाराज झालेल्या गीता जैन यांनी अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. याआधी पालघरमधून विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांचे तिकिट कापले. त्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला, ते सध्या नॉट रिचेबल आहेत.

एकनाथ शिंदे यांनी शब्द न पाळल्याने आपण व्यथित झाल्याचे म्हणत, गीता जैन यांनी आपण रडणार नसून, लढणार असल्याचे स्पष्ट केले आहे. गीता जैन म्हणाल्या की, नरेंद्र मेहता यांना पक्षाने का उमेदवारी दिली, तेच कारण शोधायला मलाही खूप कठीण वाटते. कारण समोरून जेव्हा फोन करून मला शब्द दिला जातो आणि त्यानंतर असे का घडते?