महायुतीतर्फे डॉ. बालाजी किणीकर यांचा उमेदवारी अर्ज सादर

अंबरनाथ : महायुतीतर्फे शिवसेनेचे डॉ. बालाजी किणीकर यांनी आज विधानसभा निवडणुकीसाठी अंबरनाथ येथे शिवसेना, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या आज मंगळवारी अखेरच्या दिवशी डॉ. किणीकर यांनी तहसीलदार कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे उमेदवारी अर्ज सादर केला.

कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख अरविंद वाळेकर, माजी नगराध्यक्षा मनिषा वाळेकर, उल्हासनगरचे राजेंद्र चौधरी, बदलापूर शहरप्रमुख वामन म्हात्रे, भाजपा प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले-पाटील, भाजपा शहराध्यक्ष सर्जेराव माहूरकर, राष्ट्रवादीचे अप्पा मालुसरे, माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी, अभिजित दरेकर, आदी यावेळी उपस्थित होते. उमेदवारी उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेल्या रॅलीमध्ये महाआघाडीचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अंबरनाथमध्ये विविध विकास कामे करण्यात आली आहेत. येत्या निवडणुकीत विजयी होऊ, असा विश्वास डॉ. किणीकर यांनी व्यक्त केला. विकास कामे तसेच अन्य कारणांवरून टीका करणाऱ्यांना एकाच व्यासपीठावर येण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.