ठाणे जिल्ह्यात १७ उमेदवारांनी केले अर्ज दाखल

ठाणे : ठाणे विधानसभा निवडणूक 2024 साठी नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यास सुरूवात झाली असून आज ठाणे विधानसभा मतदारसंघातून विविध पक्षांच्या एकूण 17 उमेदवारांनी नामनिर्देशन अर्ज सादर केले तर एकूण 241 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

भिवंडी विधानसभा मतदारसंघातून दोन अपक्ष उमेदवार मनिषा ठाकरे व स्नेहा पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. आज एकूण चार नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. शहापूर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (अजित पवार गट) दौलत दरोडा यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार (अजित पवार गट) शर्मिला शेळके यांनी उमेदवारी अर्ज सादर केले. तर आज एकूण 13 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

भिवंडी पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आज एकूण नऊ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. भिवंडी पूर्व मतदारसंघातून आज अपक्ष उमेदवार रुपेश म्हात्रे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर एकूण 30 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कल्याण पश्चिम मतदारसंघातून एकूण 73 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघातून आज भारतीय जनता पक्षाचे उमेदवार किसन कथोरे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तर एकूण सात नामनिर्देशन अर्जाचे वाटप करण्यात आले. अंबरनाथ मतदारसंघातून एकूण 25 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. उल्हासनगर मतदारसंघातून आज एकूण आठ नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कल्याण पूर्व विधानसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार सुलभा गायकवाड यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तर एकूण नऊ नामनिर्देशन पत्रांचे वाटप आज करण्यात आले.

डोंबिवली मतदारसंघातून आज एकूण तीन नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कल्याण ग्रामीण मतदारसंघातून महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार प्रमोद पाटील यांनी तर उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उमेदवार सुभाष भोईर यांनी आपला अर्ज सादर केला. आज एकूण पाच नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले.

मीरा-भाईंदर मतदारसंघातून अपक्ष उमेदवार हंस कुमार पांडे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला. तर 24 नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून रिपब्लिकन बहुजन सेनेच्या उमेदवार कांबळे यांनी उमेदवारी अर्ज सादर केला तर एकूण 11 नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले. ठाणे मतदारसंघातून उध्दव बाळासाहेब ठाकरे (शिवसेना) पक्षाचे उमेदवार राजन विचारे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाचे उमेदवार अविनाश जाधव यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर आज एकूण सात नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. कळवा-मुंब्रा मतदारसंघातून आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (शरदचंद्र पवार) जितेंद्र आव्हाड यांनी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार (अजित पवार गट) नजीब मुल्ला यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तर आज सात नामनिर्देशन पत्रांचे वाटप करण्यात आले. ऐरोली मतदारसंघात आज एकही अर्ज घेतला गेला नाही. बेलापूर मतदारसंघातून आज ‍दोन अपक्ष उमेदवार गुरू नरसिंह सुर्यवंशी व विजय नाहटा यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. तसेच आज एकूण सहा नामनिर्देशन पत्राचे वाटप करण्यात आले.