अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज मर्क्युरी हॉस्पिटल ठाण्यात सुरु

ठाणे : ॲडव्हॉन्स टेक्नॉलॉजीसह अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असलेल्या मर्क्युरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण रविवारी ठाण्यात झाले.
५० बेडच्या या हॉस्पिटलमध्ये शासनाच्या विविध आरोग्य योजनासोबतच गरीब असो वा श्रीमंत सर्वच रुग्णांवर वाजवी दरात उपचार मिळणार असल्याचा दावा मर्क्युरी हॉस्पिटलच्या व्यवस्थापकीय संचालकांनी केला आहे. दरम्यान, या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित मनसे नेते अविनाश जाधव यांनी, मराठी तरुणांनी एकत्र येऊन सुरू केलेली ही वैद्यकिय सेवा उल्लेखनीय असल्याचे प्रतिपादन केले.
ठाणे जिल्ह्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातून दररोज शेकडो रुग्ण ठाण्यातील सरकारी तसेच खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येत असतात. अशा रुग्णांना सोईचे ठरणारे माजिवडा, कापुरबावडी जंक्शन येथील हायस्ट्रीट मॉलच्या तळमजल्यावर ५० बेडचे मर्क्युरी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे उद्घाटन रविवारी झाले.
या सोहळ्याला, केईएम रुग्णालयाचे न्यूरोसर्जन डॉ.अतुल गोयल,रिलायन्स हॉस्पिटलचे डॉ.राहुल पंडित, ज्युपिटर हॉस्पिटलचे डॉ.रविंद्र घावट, डॉ.सुनिल कट्टी, उज्वलकुमार चव्हाण, लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे, डॉ. निलेश पोतदार, डॉ. निखिल दागदु, डॉ.विनित रणवीर, डॉ.अमोल बनाईत, मर्क्युरीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. सागर मोरनकर, डॉ. जयेश शेळके, वेंकटेश देवसानी, समाजसेवक डॉ. राजेश मढवी आदीसह अनेक स्थानिक मान्यवर मंडळी उपस्थित होती.
यावेळी बोलताना डॉ. विनित रणवीर यांनी, ठाण्यात मर्क्युरी हॉस्पिटलच्या रूपाने उत्तम अद्ययावत सुविधा रुग्णांसाठी उपलब्ध केल्या असल्याचे सांगितले. ५० बेडच्या या हॉस्पिटलमध्ये तज्ञ डॉक्टरांचे पथकासह १४ बेडचा क्रिटीकल केअर युनिट असून ॲडव्हॉन्स टेक्नॉलॉजीने युक्त असे चार सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स आहेत. त्यामुळे मेंदुंची किचकट शस्त्रक्रिया असो वा अत्यवस्थ रुग्णांवर तातडीने उपचाराची सुविधा मर्क्युरी हॉस्पिटलमध्ये उपलब्ध केल्याने रुग्णांना मुंबईला नेण्याची गरज भासणार नसल्याचे सांगितले.