उपांत्य फेरीत कोण करणार जागा पक्की? इंग्लंड की वेस्ट इंडिज की दोघेही?

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या या आवृत्तीतील शेवटचा साखळी सामना मंगळवारी दुबईत इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात खेळवला जाणार आहे. ब गटातील या दोन संघांना उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची दाट संधी आहे. तथापि, उपांत्य फेरीत स्थान मिळविण्यासाठी स्पर्धा करणारा तिसरा संघ दक्षिण आफ्रिका आहे. इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचे सहा गुण आहेत, तर वेस्ट इंडिजचे चार गुण आहेत. जर वेस्ट इंडिज इंग्लंडविरुद्ध हरले तर ते स्पर्धेबाहेर पडतील आणि जर त्यांनी इंग्लंडला पराभूत केले तर दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त असलेल्या नेट रन रेतीच्या जोरावर ते उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.

 

आमने-सामने    

इंग्लंड आणि वेस्ट इंडिज यांनी एकमेकांविरुद्ध २८ आंतराष्ट्रीय टी-20 सामने खेळले आहेत, ज्यापैकी इंग्लंडने १९ आणि वेस्ट इंडिजने आठ जिंकले आहेत. टी-२० विश्वचषकात, सहा वेळा हे दोन संघ आमने सामने आले आहेत आणि ते प्रत्येकी तीन सामन्यांत विजयी झाले आहेत.

 

संघ

इंग्लंड: हेदर नाइट (कर्णधार), डॅनी वायट-हॉज, सोफिया डंकले, नॅटली सिव्हर-ब्रंट, ॲलिस कॅप्सी, एमी जोन्स, सोफी एकलस्टन, चार्ली डीन, सारा ग्लेन, लॉरेन बेल, माइया बुशेर, लिनसे स्मिथ, फ्रेया केम्प, डॅनी गिब्सन, बेस हीथ

वेस्ट इंडिज: हेली मॅथ्यूज (कर्णधार), आलिया ॲलेन, शमिलिया कोनेल, डिआंड्रा डॉटिन, शीमेन कॅम्पबेल, अश्मिनी मुनिसार, ऍफी फ्लेचर, स्टॅफनी टेलर, शिनेल हेन्री, चेडियन नेशन, कियाना जोसेफ, झैदा जेम्स, करिश्मा रामहारक, मँडी मंगरु, नेरिसा क्राफ्टन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवायचे

डॅनी वायट-हॉज: इंग्लंडची ही उजव्या हाताची सलामीची फलंदाज या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत १३५ धावा करून तिच्या संघासाठी या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू आहे. ६८ च्या सरासरीने आणि १२४ च्या स्ट्राइक रेटने तिने धावा रचल्या आहेत.

 

सोफी एकलस्टन: इंग्लंडच्या या डावखुऱ्या फिरकीपटूने या विश्वचषकात आतापर्यंत तीन सामन्यांत चार विकेट्स घेतल्या आहेत. या जगातील अव्वल क्रमांकाच्या आंतराष्ट्रीय महिला टी-२० क्रिकेटमधील गोलंदाजाने किफायतशीर गोलंदाजी केली आहे. तिची इकॉनॉमी जवळपास चार धावा प्रति षटक राहिली आहे.

 

स्टॅफनी टेलर: वेस्ट इंडिजची माजी कर्णधार या विश्वचषकात तिच्या संघासाठी आतापर्यंत तीन सामन्यांत ७५ धावा करत आघाडीवर आहे. या उजव्या हाताच्या फलंदाजाची सरासरी ७५ आहे आणि तिची सर्वोत्तम धावसंख्या नाबाद ४४ आहे.

 

करिश्मा रामहारक: वेस्ट इंडिजच्या या उजव्या हाताच्या ऑफस्पिनरने बांगलादेशविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात चार विकेट्स पटकावल्या होत्या. तिने या स्पर्धेत ५.३२ च्या इकॉनॉमीने एकूण पाच विकेट्स घेतल्या आहेत.

 

हवामान

हवामान किंचित ढगाळ आणि उबदार राहण्याचा अंदाज आहे. तापमान ३० अंश सेल्सिअस आणि आर्द्रता ५०% असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: १५ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार