नवी मुंबई: नवी मुंबईतील एनआरआय सागरी किनार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश कदम यांना साडेतीन लाख रुपये लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने रंगेहाथ पकडले आहे. शाहबाज गावातील इमारत दुर्घटना प्रकरणी आरोपीस मदत करण्यासाठी निकम यांनी लाचेची मागणी केली होती.
तक्रारदार यांचे वडीलांविरुद्ध एनआरआय सागरी पोलीस ठाण्यात शाहबाझ गावातील इमारत पडली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये ते सध्या तळोजा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. नमूद गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता व जामीन मिळवून देण्याकरिता निकम यांनी आरोपीच्या मुलाकडे आधी ५० लाख लाचेची मागणी केली होती, असा आरोप होत आहे. तडजोडीअंती प्रथम १२ लाख व त्यानंतर दोन लाख अशी रकमेची मागणी करून कदम यांनी आधीच स्वीकारली होती. मात्र तक्रारदार यांच्या वडीलांवर पुन्हा एनआरआय सागरी पोलीस ठाणे येथे २ ऑक्टोबर २०२४ रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. व या गुन्ह्यात ताबा न घेण्याकरिता व अटक न करण्याकरिता तसेच गुन्ह्यामध्ये मदत करण्याकरिता रुपये पाच लाख रकमेची मागणी कदम यांनी केली. त्यांनतर लाचेची रक्कम देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग मुंबई या ठिकाणी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी लेखी स्व: हस्ताक्षरात तक्रार दिली. त्याच दिवशी ८ ऑक्टोबर २०२४ रोजी पंचा समक्ष पडताळणी करण्यात आली पडताळणीमध्ये नमूद आरोपी कदम यांनी तळजोडीअंती रुपये चार लाख रकमेची मागणी करून ही रक्कम त्याच दिवशी रात्री दहा वाजता ते राहत असलेल्या उलवे येथील इमारतीजवळ आणून देण्याचे सांगितले .प्राप्त तक्रारीनुसार लाच लुचपत विभागाने सापळा लावला असता सतीश कदम यांना साडेतीन लाख रुपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.