दक्षिण आफ्रिकेची नजर उपांत्य फेरीकडे, स्कॉटलंडची पहिल्या टी-२० विश्वचषक विजयाकडे

त्यांचा पहिला-वहिला टी-२० विश्वचषक खेळणाऱ्या, स्कॉटलंडने या स्पर्धेत आतापर्यंत एकही सामना जिंकला नसला तरी अव्वल दर्जेच्या खेळाडूंविरुद्ध सर्वोच्च पातळीवर खेळण्याच्या त्यांच्या सकारात्मक हेतूने त्यांनी मन जिंकले आहे. आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या या नवव्या आवृत्तीतील त्यांच्या तिसऱ्या सामन्यात, स्कॉटलंडची बुधवारी दुबईत दक्षिण आफ्रिकेशी लढत होईल. स्कॉटलंडने अद्याप गुणतालिकेत आपले खाते उघडलेले नाही, तर दक्षिण आफ्रिकेचे दोन सामन्यांत दोन गुण (विजय: १, पराभव: १) आहेत.

आमने-सामने

स्कॉटलंड आणि दक्षिण आफ्रिका एकमेकांविरुद्ध पहिला आंतराष्ट्रीय टी-२० सामना खेळणार आहेत.

 संघ

स्कॉटलंड: कॅथरीन ब्राइस (कर्णधार), सारा ब्राइस, लोर्ना जॅक-ब्राउन, अब्बी एटकेन-ड्रमंड, अबताहा मकसूद, सास्किया हॉर्ले, क्लोई एबेल, प्रियनाझ चॅटर्जी, मेगन मॅकॉल, डार्सी कार्टर, आयल्सा लिस्टर, हॅना रेनी, रेचेल स्लेटर, कॅथरीन फ्रेझर, ऑलिव्हिया बेल

दक्षिण आफ्रिका: लॉरा वूल्फार्ट (कर्णधार), ॲनेके बॉश, तझमिन ब्रिट्स, नादिन डी क्लर्क, ॲनेरी डेर्कसन, मिके डी रिडर, आयंडा ह्लुबी, सिनालो जाफ्ता, मारिझान काप, अयाबोंगा खाका, सुने लिस, नॉनकुलुलेको मलाबा, तुमी सेखुखुने, सेशनी नायडू, क्लोई ट्रायॉन

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

आयल्सा लिस्टर: स्कॉटलंडच्या या उजव्या हाताच्या मधल्या फळीतील फलंदाजाने वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघासाठी सर्वाधिक धावा केल्या. तिने ३३ चेंडूत २६ धावा जमवल्या, ज्यात एक चौकाराचा समावेश होता.

ऑलिव्हिया बेल: स्कॉटलंडची ही उजव्या हाताची ऑफस्पिनर वेस्ट इंडिजविरुद्धच्या मागील सामन्यात तिच्या संघाची सर्वात यशस्वी गोलंदाज होती. तिने तीन षटकांत १८ धावा देऊन दोन विकेट्स पटकावल्या. ती तिच्या संघासाठी सर्वात किफायतशीर गोलंदाज देखील होती.

लॉरा वूल्फार्ट: दक्षिण आफ्रिकेच्या कर्णधाराने इंग्लंडविरुद्ध तिच्या मागील सामन्यात संघाला चांगली सुरुवात करून दिली. तिने ३९ चेंडूत ४२ धावा केल्या. तिची खेळी तीन चौकारांनी रंगली होती. १६व्या षटकापर्यंत फलंदाजीकरत तिने संघाचा डाव एकत्रित ठेवला.

मारिझान काप: दक्षिण आफ्रिकेच्या या धडाकेबाज अष्टपैलूने इंग्लंडविरुद्धच्या तिच्या मागील सामन्यात बॅट आणि चेंडूने उपयुक्त योगदान दिले. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करताना तिने १७ चेंडूत २६ धावा झळकावल्या. त्यानंतर गोलंदाजी करताना तिने दोन निर्धाव षटकासह (मेडन्स) चार षटकांत १७ धावा देऊन एक विकेट घेतली.

हवामान

सुमारे ३७ अंश सेल्सिअस तापमानासह हवामान उबदार राहण्याची अपेक्षा आहे. भरपूर सूर्यप्रकाशदेखील असेल. आर्द्रता जवळपास ४१% राहील.

 सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ९ ऑक्टोबर २०२४

वेळ: दुपारी ३:३० वाजता

स्थळ: दुबई आंतराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार