आशियाई दिग्गज श्रीलंका आणि पाकिस्तान आज येणार आमने-सामने

आयसीसी महिला टी-२० विश्वचषकाच्या नवव्या आवृत्तीचा दुसरा सामना ३ ऑक्टोबर रोजी शारजाह येथे दोन आशियाई दिग्गज श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात खेळवला जाईल. भारत, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडसह श्रीलंका आणि पाकिस्तान या स्पर्धेत ‘अ’ गटात सामील आहेत.

 

आमने-सामने

श्रीलंका आणि पाकिस्तान एकमेकांविरुद्ध २० टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये श्रीलंकेने नऊ आणि पाकिस्तानने १० जिंकले आहेत. टी-२० विश्वचषक स्पर्धेत श्रीलंका 2-1 ने आघाडीवर आहे.

 

संघ

श्रीलंका: चमारी अथापथु (कर्णधार), अनुष्का संजीवनी, हर्षिता समरविक्रमा, निलाक्षिका सिल्वा, इनोका रणवीरा, हसिनी परेरा, कविशा दिलहरी, सचिनी निसानसाला, विश्मी गुणरत्ने, उदेशिका प्रबोधनी, अचिनी कुलसूरिया, सुगंदिका कुमारी, इनोशी प्रियदर्शनी, शशिनी गिम्हानी, अमा कांचना

पाकिस्तानः फातिमा सना (कर्णधार), आलिया रियाझ, डायना बेग, गुल फिरोजा, इरम जावेद, मुनीबा अली, नशरा सुंधू, निदा दार, ओमायमा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सय्यदा आरूब शाह, तस्मिया रुबाब, तुबा हसन

 

कुठल्या खेळाडूंवर लक्ष ठेवावे

चमारी अथापथु: डावखुरी सलामीवीर आणि ऑफ स्पिनर असलेली श्रीलंकेची कर्णधार ही संघातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू आहे. तिच्या १५ वर्षांच्या शानदार आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत तिने ३००० हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-२० धावा झळकावल्या आहेत आणि ५०+ विकेट्स घेतल्या आहेत.

इनोका रणवीरा: श्रीलंकेची डावखुरी फिरकीपटू ८२ सामन्यांत ९१ बळींसह तिच्या संघासाठी सर्वात यशस्वी आंतरराष्ट्रीय टी-२० गोलंदाज आहे. ती नियमितपणे विकेट्स तर घेतेच पण त्याचबरोबर किफायतशीर गोलंदाजी देखील करते.

मुनीबा अली: पाकिस्तानच्या या शैलीपूर्ण डावखुऱ्या फलंदाजाने १०००+ आंतराष्ट्रीय टी-२० धावा बनवल्या आहेत. पाकिस्तानसाठी महिलांच्या आंतराष्ट्रीय टी-२०मध्ये ती एकमेव शतकवीर आहे. याशिवाय, ती यष्टिरक्षक म्हणून योगदान देते.

निदा दार: या पाकिस्तानी अष्टपैलू खेळाडूकडे १५० हून अधिक आंतराष्ट्रीय टी-२० सामने खेळण्याचा दणदणीत अनुभव आहे. ऑफ स्पिन गोलंदाजी करत तिने १४३ विकेट्स पटकावल्या आहेत. तसेच तिच्या नावावर २०२१ धावासुद्धा आहेत.

 

ग्राउंडची आकडेवारी

आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२४ च्या आधी, २०१५ आणि २०१७ दरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियमवर १० महिला टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले गेले आहेत. प्रथम आणि द्वितीय फलंदाजी करणाऱ्या संघांनी समान संख्येने सामने जिंकले आहेत. पहिल्या डावात सर्वाधिक विजयी धावसंख्या १५१ आहे.

 

हवामान

हवामान दमट आणि उबदार राहण्याची अपेक्षा आहे. तापमान ३० अंश सेल्सिअसच्या आसपास असेल.

 

सामन्याची थोडक्यात माहिती

तारीख: ३ ऑक्टोबर २०२४

वेळ: संध्याकाळी ७:३० वाजता

स्थळ: शारजाह क्रिकेट स्टेडियम

प्रसारण: स्टार स्पोर्ट्स नेटवर्क, डिस्नी + हॉटस्टार