विजेच्या खांब्याचा शॉक लागून तरुणाचा मृत्यू

उल्हासनगर: उल्हासनगर कॅम्प 5 झूलेलाल बाजार येथील मंगलमूर्ती गल्लीत सतगुरू्स गाऊन सेंटरच्या समोर एक विजेचा खांब आहे. या विजेच्या खांबाला हात लागल्याने राकेश गेलानी नामक व्यक्तीचा शॉक लागून मृत्यू झाला आहे.

राकेश गेलानी ही व्यक्ती दुपारच्या सुमारास गल्लीतून जात असताना सदगरूस गाऊन सेंटरच्या समोर विजेच्या खांबाला आधार घेण्यासाठी गेला असता राकेशला विजेचा शॉक लागला. यात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. महावितरणच्या बेजबाबदारपणामुळे राकेशने जीव गमावला असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.

घटनेची माहिती मिळताच हिललाईन पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून राकेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मध्यवर्ती रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.