ठाणे जिल्ह्यात पदवीधर मतदारांसाठी ११८ मतदान केंद्रे

ठाणे : विधान परिषदेच्या कोकण विभाग पदवीधर मतदार संघासाठी ठाणे जिल्ह्यातील ११८ मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. २६ जूनला सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत चालणार्‍या या प्रक्रीयेसाठी जिल्ह्यातील ९८,८६० पदवीधर आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश कीर यांच्यात थेट लढत होणार आहे. ही निवडणूक प्रकीया पार पाडण्यासाठी संपूर्ण कोकण विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यातही या निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाने संपूर्ण तयारी केली आहे.
कोकण विभाग पदवीधर मतदारसंघातील पालघर जिल्ह्यात स्त्री १२,९८७ व पुरुष १५,९३० तर तृतियपंथी ८, ठाणे जिल्ह्यात स्त्री ४२,४७८ व पुरुष ५६,३७१ तर तृतियपंथी ११, रायगड जिल्ह्यात स्त्री २३,३५६ व पुरुष ३०,८४३ तर तृतियपंथी ९, रत्नागिरी जिल्ह्यात स्त्री ९,२२८ व पुरुष १३,४५३, सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्त्री ७,४९८ व पुरुष ११,०५३ असे एकूण दोन लाख २३,२२५ नोंदणी होणार्‍या पदवीधर मतदारांची संख्या आहे.