असे करा बाथरूम सुसज्ज आणि आकर्षक

बाथरूम हा घराचा महत्वाचा भाग आहे. ही जागा साधारणपणे स्वच्छ, शांत आणि सुव्यवस्थित असावी असे सर्वांनाच वाटते. सध्या बाथरूम डेकोरेशन बहुचर्चित व महत्वाचा विषय आहे. सर्वांनाच आपल्या घरातील बाथरूम सुसज्ज असावे असे वाटते. बाथरूम जास्तीत जास्त सुसज्ज आणि आकर्षक करण्यासाठी काही महत्वाच्या टिप्स –

बाथरूममध्ये स्मार्ट वॉटर सेव्हिंग फिचरचा वापर करा. कलरफुल बाथरूम ॲक्सेसरीज वापरा. फ्लोरिंग व सिलिंगपर्यंत एकसारख्या टाईल्सचा वापर करा. ताजेतवाने वाटण्यासाठी घरीच स्पाची सोय करा.  
कमीतकमी जागेत उत्तम बाथरूम डेकोरेशन कसे करावे ?
  • जागेची बचत करण्यासाठी पॉकेट डोअरचा वापर करावा 
  • ४’-०” फूटवर भिंतीवर आरसा लावावा.
  • लहान वॉश बेसिन व हँगिंग वॅनिटीजचा वापर करावा. 
  • हँगिंग कमोडचा वापर करावा. 
  • कन्सिल्ड फ्लॅश टँकचा वापर करावा. 
डिझाईन व स्ट्रक्चर

  • ड्राय व वेट एरिया वेगळा असावा. 
  • डिझाईन करताना कार्यक्षमतेचा व व्यवहारिकतेचा विचार करावा.
  • शॉवर, divestor, WC with flush tank, तसेच टू इन वन बीबी कॉक, टॅब सोबत वॉश बेसिनचा वापर करावा.

लाईट अरेंजमेंट्स –

  • कॉर्नर प्रोफाईल लाईटचा वापर करा. 
  • मूड लाईटसाठी कॉब लाईटचा वापर करा.
  • आरसा बरोबर येणाऱ्या लाईटचा वापर करावा.
  • फॉल्स सिलिंग नसल्यास सरफेस पॅनल लाईटचा वापर करा.

बजेट
प्लम्बिंग, फॉल्स सिलिंग, पेंटिंग आणि सिव्हिल वर्क इ. समाविष्ट असलेले 4′-0″ x 7′-0″ बाथरूम सर्वात सामान्य आकारांपैकी एक आहे आणि नूतनीकरणासाठी सुमारे सव्वा लाख ते दोन लाख रुपये खर्च येऊ शकतो.

टेक्नॉलॉजी

  • स्मार्ट बाथरूम गॅझेट्सचा वापर करा. 
  • सेन्सर टॅप्सचा (नळांचा) वापर करावा. 
  • ऑटोमॅटिक टॉयलेट्सचा वापर करावा. 
  • आरामदायी बाथटब, ब्लूटूथ म्युझिक सिस्टिम, फूट जेट्स, इ. अनेक उपकरणांचा वापर करू शकता.

कलर कॉम्बिनेशन्स –
तुमच्या बाथरूम किंवा शॉवर रूममध्ये तुम्हाला हवे असलेले देखावे, डिझाईन तयार करण्यासाठी बाथरूममध्ये उत्तम रंगसंगती आवश्यक आहे आणि एक अनोखा लूक तयार करण्यासाठी वेगवेगळ्या ॲक्सेसरीज वापरू शकता. 

 
बाथरूमसाठी काही ट्रेंडी रंगसंगती
  • पावडर ब्लू + ब्लॅक ट्रिपिकल ब्राईटस
  • ॲक्वा + डेनिम + क्रिप व्हाईट    
  • ब्लॅक + व्हाईट + वूड टोन     
  • न्यूटीकल ब्लू + टेरा कोट्टा ऑरेंज  

बाथरूम टाईल्स –
बाथरूममधील टाईल्स अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात. या टाईल्स बाथरूमला वॉटरप्रूफ ठेवण्याचे काम करतात. यात व्हिट्रीफाइड टाईल्स, फुल बॉडी टाईल्स, मार्बल फिनिश टाईल्स, वूडन फिनिश टाईल्स इत्यादींचा वापर प्रामुख्याने केला जातो.

बाथरूम वॉलसाठी ४x२ टाईल्सचा वापर करावा.
योग्य स्लोपसाठी १x१ टाईल्सचा वापर करा.
अप्लायंसेस –
प्लम्बिंग फिचर – बाथरूमसाठी सर्वोत्तम ॲक्सेसरीज निवडण्याचा मुख्य मार्ग म्हणजे बाथरूम शोरूमला भेट देणे. या ठिकाणी तुम्हाला समोर विविध पर्याय उपलब्ध असल्याने आपल्या आवडीनुसार वेगवगेळ्या ॲक्सेसरीज  आपण घेऊ शकतो. 
 
बाथरूमसाठी काही उपयुक्त साधने 
  • स्टीम शॉवर    
  • जाकुझी टब     
  • टॉवेल रॅक    
  • साऊंड सिस्टिम   
  • ऑटोमॅटिक सोप डिस्पोझर 
मॉडर्न बाथरूम इंटिरियरसाठी काही टिप्स –

  • मोनोक्रोम रंगसंगतीचा वापर करा.
  • एखादी भिंत तुम्ही वेगळ्या पद्धतीने सजवू शकता.
  • फ्लोअरिंगमध्ये abstract डिझाईन टाईल्स घेऊ शकता.
  • विविध प्रकारच्या मटेरियल्सचा एकत्रितरित्या वापर करा. उबदार वातावरण निर्मिती करा. पारंपारिक व समकालीन या दोन्ही शैलींचा वापर एकत्रितरित्या करा.
सेफ्टी टिप्स –

  • स्किड प्रूफ टाईल्स व अँटी स्लीपिंग फ्लोअरिंगचा वापर करावा. 
  • विद्युत उपकरणे पाण्यापासून दूर ठेवा, यामुळे शॉर्ट सर्किटचा धोका कमी संभवतो.
  • प्लम्बिंगचे काम करताना कॉपर पाईप असावा. दुसरा पर्याय CPVC पाईपचा वापर करावा.
इतर महत्वाच्या टिप्स –
  • तुमच्या पसंतीचे डिझाईन निवडा. 
  • यात कलर स्कीम, नवीन फीचर्स, स्टोरेज स्पेस इ .चा समावेश असुद्या. 
  • बाथरूम मधील आरशाची सजावट करा.
  • घरीच बाथरूम ऑर्गनाईझर तयार करा. 
  •  
– अलका कुडतरकर 
इंटिरियर डिझायनर, डेकोर बी इंटीरियर्स 
9833671889
========================
 
बाथ सेटअप – श्रीपाल एन्टरप्रायजेस

या दुकानात बाथरूममध्ये लावल्या जाणाऱ्या टाईल्स, मार्बल, वेस्टर्न टॉयलेट, वॉश बेसिन उपलब्ध आहेत. टाईल्समध्ये मार्बल, मेड फिनिश, कलर बॉडी टाईल्स इ .प्रकारांचा समावेश आहे. २ फूट बाय ४ फूट, ६ बाय ४ फूट या टाईल्सच्या साईझ सध्या लेटेस्ट ट्रेंडमध्ये असलेल्या टाईल्स सुद्धा येथे मिळतात.
कुठे – गणेशवाडी, ठाणे (प.)
आर्यन सिरॅमिक
येथे विविध प्रकारच्या टाईल्स, मार्बल्स उपलब्ध आहेत. तसेच सध्या ट्रेंडिंगमध्ये असणारे बाथरूम वॉल मिररसुद्धा येथे उपलब्ध आहेत. बाथरूम डेकोरेशनसाठी लागणारी विविध साधने येथे मिळतात.कुठे – मानपाडा, ठाणे(प)