रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनचा उपक्रम
ठाणे: रोटरी क्लब ऑफ डोंबिवली मिडटाऊनमार्फत शहापूरजवळील उठावा गाव इथे पाण्याच्या समस्येवर निवारण म्हणून एक बंधारा बांधण्यात आला आहे. या बंधाऱ्यामुळे गावातील पाणी टंचाईवर काही प्रमाणात मात करता येईल, शिवाय विहिरींचा जलस्तर वाढण्याची शक्यता आहे.
या बंधाऱ्याचे लोकार्पण 15 जून रोजी रोटरीचे प्रांतपाल मिलिंद कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. या बंधाऱ्यामुळे गावातील 100 कुटुंबांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या कमी होईल आणि गावातील विहिरींचा जलस्तर वाढेल असे ग्रामस्थांनी सांगितले.
यावेळी रोटरीचे उप प्रांतपाल शैलेश गुप्ते, उप प्रशिक्षक सलील जोशी, रोटरी क्लबचे सदस्य, गावचे सरपंच श्री. भगत, उपसरपंच अजय कथोरे, जिल्हा परिषद शाळेचे श्री.मगर, माऊली ग्रुपचे चारुदत्त कोलारकर, पंकज दातार आदी उपस्थित होते. या बंधाऱ्याचे प्रकल्पप्रमुख रोटेरिअन सुनील सरोदे, रो. विकास डोके आणि रो.बाळु घुले हे होते. कार्यक्रमाच्या शेवटी रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रदिप बुडबाडकर आणि सचिव श्रीनिवासन मुदलीयार यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानले.